Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

बँकेत जॉब शोधणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ बँकेत निघाली लिपिक पदाची मोठी भरती, पदवीधर तरुण राहणार पात्र, आजच करा अर्ज

Banking Job Maharashtra : राज्यातील हजारो तरुण बँकिंग जॉबसाठी बँकिंग एक्झाम साठी तयारी करत असतात. दरम्यान बँकेत जॉब शोधणाऱ्या तरुणांसाठी, बँकिंग एक्झाम ची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी आजची ही बातमी विशेष खास आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

कारण की नागपूर नागरिक सहकारी बँक येथे काही रिक्त जागांसाठी भरती आयोजित करण्यात आली आहे. यामुळे ज्या तरुणांना बँकेत नोकरी करण्याची इच्छा असेल अशा तरुणांसाठी ही निश्चितच सुवर्णसंधी राहणार आहे.

बँकेने यासाठी अधिसूचना जारी केली असून या अधीसूचनेनुसार बँकेत लिपिक या पदाच्या रिक्त जागा या भरतीच्या माध्यमातून भरल्या जाणार आहेत. अशा परिस्थितीत आज आपण या लिपिक पदभरती संदर्भात सर्व आवश्यक माहिती थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

हे पण वाचा :- मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेसबाबत मोठी अपडेट ! ‘या’ दिवशी सुरु होणार; कोणत्या स्टेशनवर थांबा घेणार, कस राहणार वेळापत्रक आणि तिकीट दर? वाचा…

नागपूर नागरिक सहकारी बँकेत कोणत्या पदासाठी होणार भरती

अधिसूचनेनुसार या बँकेत लिपिक या रिक्त पदाच्या जागा भरल्या जाणार आहेत.

किती जागांसाठी होणार आहे भरती

या पदभरतीच्या माध्यमातून लिपिक या पदाच्या 50 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

आवश्यक शैक्षणिक पात्रता

कोणत्याही विषयातील किमान 50 टक्के गुणांसह पदवी परीक्षा उत्तीर्ण तरुण यासाठी पात्र राहतील. तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवार 45% गुणांसह पदवी परीक्षा उत्तीर्ण असायला हवेत. सोबतच या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला कम्प्युटरच बेसिक नॉलेज असणे आवश्यक आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी एकदा अधिसूचना वाचावी लागणार आहे.

वयोमर्यादा

कमाल 28 वर्षे वयाचा उमेदवार यासाठी पात्र राहणार असून अनुसूचित जाती आणि जमाती प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयोमर्यादित सूट दिली जाणार आहे.

हे पण वाचा :- तरुणांसाठी वन विभागात नोकरीची सुवर्णसंधी; ‘या’ पदासाठी निघाली भरती, पगार मिळणार तब्बल 40 हजार, वाचा सविस्तर

परीक्षा फी किती राहणार

सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांना सातशे रुपये परीक्षा फी राहणार आहे. तसेच अनुसूचित जाती आणि जमाती प्रवर्गातील उमेदवारांकडून 350 रुपये परीक्षा फी या ठिकाणी घेतली जाणार आहे.

अर्ज कसा करावा लागणार?

लिपिक पदासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. इच्छुक उमेदवार आपला अर्ज मुख्य कार्यकारी अधिकारी, नागपुर नागरी सहकारी बँक लि., 79, वर्धमान नगर, डॉ., आंबेडकर स्क्वे., सेंट्रल अॅव्हेन्यू, नागपूर-440008 या पत्त्यावर पाठवू शकणार आहेत.

अर्ज करण्याची शेवटची दिनांक?

या पदासाठी इच्छुक उमेदवारांना 7 जून 2023 पर्यंत आपला अर्ज ऑफलाइन पद्धतीने वर दिलेल्या पत्त्यावर पाठवता येणार आहे.

जाहिरात कुठं पाहणार

या पदभरतीची जाहिरात पाहण्यासाठी नागपूर नागरिक सहकारी बँक भरती 2023 या लिंक वर क्लिक करा. 

हे पण वाचा :- स्टॉक असावा तर असा ! ‘या’ स्टॉकनें 3 वर्षातच आपल्या गुंतवणूकदारांना दिला करोडोचा परतावा, वाचा…