बारावी पास तरुणांसाठी आनंदाची बातमी! BSF मध्ये निघाली भरती; घरबसल्या इथं करा अर्ज, पहा डिटेल्स

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

BSF Recruitment : नोकरीच्या शोधात असलेल्या आणि बॉर्डर सिक्युरिटी फोर्स मध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. बॉर्डरवर जाऊन देशाची सेवा करू इच्छिणाऱ्यांसाठी ही निश्चितच आनंदाची पर्वणी राहणार आहे. बॉर्डर सेक्युरिटी फॉर्स अर्थातच बीएसएफने हेड कॉन्स्टेबल या पदासाठी भरती सुरू केली आहे. यासाठीची अधिसूचना नुकतीच प्रसिद्ध झाली असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांना लवकरात लवकर अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

यासाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा असून अद्याप यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झालेली नाही. अधिसूचना मात्र जारी झाली आहे. अधिसूचनेत दिलेल्या माहितीनुसार 22 एप्रिल 2023 पासून या पदासाठी इच्छुक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. म्हणजे येत्या शनिवारपासून अर्ज प्रक्रिया सुरू होणार असून इच्छुकांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. दरम्यान आज आपण या भरतीबाबत आवश्यक माहिती थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

हे पण वाचा :- नाशिकच्या शेतकऱ्याचा नादखुळा! अंजीरच्या या जातीच्या लागवडीतून एका एकरात कमवलेत 3 लाख, पहा ही यशोगाथा

आवश्यक शैक्षणिक पात्रता

बीएसएफने दिलेल्या माहितीनुसार हेड कॉन्स्टेबल या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार हा बारावी सायन्स उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथेमॅटिक्स या तीन विषयांसह किमान 60 टक्के गुण मिळवलेला उमेदवार या पदासाठी पात्र राहणार आहे. तसेच आयटीआय झालेल्या उमेदवारांना देखील या पदासाठी अर्ज करता येणार असल्याची माहिती अधिसूचनेच्या माध्यमातून समोर आली आहे. दरम्यान इच्छुक उमेदवारांना शैक्षणिक पात्रते संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी अधिसूचना काळजीपूर्वक वाचायची आहे.

हे पण वाचा :- सिबिल स्कोर झिरो असतांनाहि मिळणार कर्ज ! काय असतात यासाठी अटी? पहा….

वयोमर्यादा

या पदासाठी अर्ज करू इच्छिणारा उमेदवार हा 18 ते 25 वर्षे वयोगटातील असणे गरजेचे आहे. तसेच रिझर्व कॅटेगिरी मधील उमेदवारांना नियमानुसार या ठिकाणी वयोमर्यादित सूट बहाल केली जाणार आहे.

कशी होणार उमेदवारांची निवड

या पदासाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी, वैद्यकीय चाचणी आणि कागदपत्रांच्या पडताळणी नंतर होणार आहे. या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी मात्र उमेदवारांना एकदा बीएसएफच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागणार आहे.

हे पण वाचा :- अहमदनगरकरांसाठी महत्त्वाची बातमी! ‘या’ तारखेपासून मिळणार 600 रुपयात 1 ब्रास वाळू; नगर जिल्ह्यात होणार प्रथम अंमलबजावणी, महसूलमंत्र्यांची माहिती, पहा……

अर्ज कसा करावा लागणार

इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. यासाठी उमेदवारांना सर्वप्रथम बीएसएफ च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यायची आहे. अधिकृत संकेतस्थळावर भेट दिल्यानंतर कॉन्स्टेबल रिक्रुटमेंट या पर्यायावर क्लिक करून इच्छुक उमेदवार आपला अर्ज भरू शकणार आहेत. अर्ज करताना मात्र वैयक्तिक माहिती तसेच शैक्षणिक माहिती न चुकता आणि काळजीपूर्वक भरायची आहे. तसेच अर्ज हा विहित मुदतीत सादर करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची दिनांक

यासाठी अर्ज करण्यास 22 एप्रिल पासून सुरुवात होणार आहे. तसेच अर्ज हा 12 मे 2023 पर्यंत इच्छुक उमेदवारांना सादर करता येणार आहे.

हे पण वाचा :- मुंबई-पुणे एक्सप्रेस वे बाबत झाला मोठा निर्णय ! आता महामार्गांवर ‘या’ वाहनांना असेल बंदी, कारण काय? पहा…..