Business Idea : हा व्यवसाय सुरू करा आणि महिन्याला कमवा 30 हजार, वाचा लागणारी गुंतवणूक आणि मिळणारा नफा

Ajay Patil
Published:
khakara making business

Business Idea :- आजकालच्या तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता एखाद्या छोट्या-मोठे व्यवसायाची निवड करणे खूप गरजेचे असून अगदी कमीत कमी भांडवलामध्ये देखील व्यवसाय सुरू करता येतो. फक्त तुमची व्यवसायाची निवड आणि त्याला असलेली मागणी, संबंधित व्यवसायाची सखोल माहिती घेतल्यानंतर सुरुवात करणे गरजेचे आहे.

कमीत कमी जागेत, कमीत कमी भांडवल टाकून सुरू केलेले व्यवसाय देखील प्रचंड प्रमाणात पैसा देण्याची क्षमता ठेवतात. फक्त गरज असते ती व्यवसायाची प्लॅनिंग व्यवस्थित करण्याची. याच मुद्द्याला धरून जर आपण एका व्यवसायाचा विचार केला तर तो कमीत कमी भांडवलात सुरू होणारा आणि बाजारपेठेत कायम मागणी असणारा व्यवसाय असून या माध्यमातून तुम्ही चांगला नफा मिळवू शकतात.

 खाकरा बनवण्याचा व्यवसाय

हा व्यवसाय तुम्हाला सुरू करायचा असेल तर तुम्हाला अगोदर काही कच्चामालाची आवश्यकता भासेल. याकरिता तुम्हाला गव्हाचे पीठ, बेसन पीठ, अजवाइन, कस्तुरी मेथी, हळद, मीठ, मिरची आणि तेल आणि याशिवाय तुम्हाला रोटी मेकर मशीन देखील लागते. या माध्यमातून तुम्ही खाकरा बनवण्याचा व्यवसाय सुरू करू शकतात. याकरिता तुम्ही काही महिला रोजगारावर ठेवून हा व्यवसाय सुरू करू शकतात. खाकरा बनल्यानंतर त्याची पॅकिंग करणे देखील गरजेचे असते व याकरिता तुम्हाला पॅकिंग मशीन व पॅकिंग पाऊचची आवश्यकता भासते.

 अशा पद्धतीने बनवतात खाकरा

यामध्ये आपण एक किलो खाकरा बनवण्याचे प्रमाण पाहणार आहोत. त्यानुसार तुम्ही जास्त प्रमाणात देखील खाकरा तयार करू शकतात. एक किलो खाकरा बनवण्याकरिता तुम्हाला सर्वप्रथम भांड्यामध्ये 700 ग्राम गव्हाचे पीठ टाकावे लागेल व त्यामध्ये 300 ग्राम बेसन घालावे लागेल. त्यामध्ये दहा ग्रॅम बारीक अजवाइन, दहा ग्रॅम मेथी, दहा ग्रॅम मिरची टाकणे गरजेचे असून 20 ग्रॅम हळद आणि 20 ग्रॅम मीठ टाकावे. तसेच 200 मिली तेल यामध्ये टाकणे गरजेचे आहे.

हे सगळे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यावे व त्यामध्ये नंतर थोडेसे पाणी टाकावे आणि याचे पीठ तयार करा. अगदी चपाती बनवण्यासाठी ज्या पद्धतीने पीठ तयार केले जाते त्याच पद्धतीने पीठ खाकरा बनवण्यासाठी देखील बनवले जाते. त्यानंतर रोटी मेकर मशीनच्या साह्याने तुम्ही खाकरे लाटून घ्यावेत व गॅसवर त्यांना व्यवस्थित भाजून घ्यावे. अशापद्धतीने तुमचा खाकरा तयार होतो व तुम्ही त्याला व्यवस्थित पॅकिंग करून विक्रीला पाठवू शकतात.

 हा व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणारी गुंतवणूक

यामध्ये जर तुम्ही गुंतवणूक पकडली तर गव्हाचे पीठ 25 रुपये किलो, बेसन पीठ 80 ते 100 रुपये किलो, अजवाइन 450 रुपये किलो, कस्तुरी मेथी चौदाशे रुपये किलो, मिरची पावडर आणि मीठ दहा रुपयांच्या पॅकेटमध्ये तुम्हाला मिळते. 120 ते 130 रुपये लिटर तेल  आणि दोन हजार रुपयाची रोटी मेकर मशीन आणि पॅकिंग करता लागणारे बाराशे रुपयाचे पॅकिंग मशीन इतकी साधारणपणे तुम्हाला गुंतवणूक लागते. साधारणपणे जर एक विचार केला तर चार ते पाच हजार रुपयांमध्ये हा व्यवसाय आरामात सुरू करता येतो.

 किती नफा मिळेल?

एक किलो मसाला खाकरा बनवायचा असेल तर त्याकरिता शंभर रुपये खर्च येतो व होलसेल मध्ये तुम्ही त्याला 150 ते 170 रुपये आणि किरकोळ बाजारामध्ये 240 रुपये किलोने विकू शकतात. होलसेलमध्ये जर तुम्ही विकला तर एक किलो मागे तुम्हाला पन्नास रुपये नफा मिळतो व या पद्धतीने तुम्ही जर एका दिवसांमध्ये वीस किलो खाकरा बनवला व त्याची विक्री केली तर तुम्हाला एक हजार रुपये आणि एका महिन्यामध्ये साधारणपणे तीस हजार रुपये कमाई होऊ शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe