Business Success Story: सायकलने घरोघरी दूध विकून दिवसाला कमाई होती 3 रुपये; आज दूध व्यवसायात आहे 800 कोटींचा टर्नओव्हर! वाचा यशोगाथा

Ahmednagarlive24 office
Published:

Business Success Story:- ध्येयविरहित जीवन जगणे म्हणजे जिवंत असून निर्जीव वस्तूंप्रमाणे आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. कारण व्यक्तीच्या आयुष्यामध्ये ध्येय असेल तर ते पूर्ण करण्यासाठी तो काहीतरी प्रयत्न करत असतो व जीवनाला अर्थ प्राप्त होतो. कारण कुठलीही गोष्ट करण्यासाठी एखादे कारण हवे असते व त्या कारणांमुळेच काही गोष्टी घडत असतात.

याच पद्धतीने जर ध्येय असेल तरच व्यक्ती सार्थकी आयुष्य जगतो व यशाच्या उंचीवर पोहोचतो. अगदी याच मुद्द्याला धरून आपण समाजामध्ये अशी अनेक उदाहरणे किंवा उद्योजक पाहिले असतील किंवा त्यांच्याबद्दल ऐकले असेल की सुरुवातीचे आयुष्य अगदी शून्यात जमा असताना ते आज यशाच्या मोठ्या शिखरावर विराजमान आहेत.

परंतु या प्रवासामध्ये मात्र प्रचंड प्रमाणात कष्ट तसेच सातत्य व जोपर्यंत ध्येयापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत अविश्रांत श्रम या गोष्टींचा मोठा हातभार असतो. अगदी याच मुद्द्याला धरून जर आपण रेड काऊ डेअरीचे फाउंडर आणि मॅनेजिंग डायरेक्टर नारायण मुजुमदार यांची यशोगाथा पाहिली तर ती काहीशी या मुद्द्याला साजेशी आहे.

सायकल वरून दूध विक्री ते 800 कोटींचा डेअरी व्यवसाय

याबाबत सविस्तर वृत्त असे की, 25 जुलै 1958 यावर्षी पश्चिम बंगाल राज्यामध्ये असलेल्या नादिया जिल्ह्यात नारायण मुजुमदार यांचा जन्म झाला. त्यांच्या कुटुंबामध्ये ते तिघे भाऊ-बहीण होते व वडील हे शेतकरी आणि आई या गृहिणी होत्या. या सगळ्या कौटुंबिक पार्श्वभूमी मध्ये नारायण मुजुमदार यांनी 1975 यावर्षी डेअरी टेक्नॉलॉजी चे शिक्षण पूर्ण केले व शिक्षणात अतिशय हुशार असल्यामुळे त्यांना पश्चिम बंगाल सरकारकडून शंभर रुपये स्कॉलरशिप मिळायची व वडील प्रत्येक महिन्याला शंभर रुपये त्यांना द्यायचे.

अशा पद्धतीने त्यांनी त्यांच्या या आर्थिक परिस्थितीमध्ये कसेबसे शिक्षण सुरू ठेवले व सगळ्या कालावधीमध्ये त्यांना आर्थिक परिस्थितीमुळे एक एकर शेती विकण्याची देखील वेळ आली. घरच्यांना आर्थिक हातभार लागावा याकरिता त्यांनी 1981 यावर्षी मदर डेअरी मध्ये काम करायला सुरुवात केली व तेथून खऱ्या प्रकारे त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. विविध प्रकारच्या कंपन्यांमध्ये त्यांनी काम केले.विविध कंपन्यांमध्ये काम करत असताना त्यांनी सात ते दहा लाख रुपयांचे गुंतवणूक केली आणि 500 लिटर क्षमतेचे पहिले मिल्क टँकर खरेदी केले 2003 मध्ये मुजुमदार यांनी रेड काऊ डेअरी नावाची कंपनी सुरू केली.

सध्या त्यांची रेड काऊ ही पूर्व भारतामध्ये सर्वात प्रसिद्ध आणि मोठी डेअरी असून त्यांची वार्षिक उलाढाल 800 कोटींपेक्षा जास्त आहे. नारायण मुजुमदार यांच्या रेड काऊ कंपनीच्या माध्यमातून दूधच नाही तर दही, तूप तसंच पनीर आणि रसगुल्ला शिवाय इतर दुधापासून बनवलेले पदार्थांची विक्री देखील केली जाते. आज त्यांचा हा उद्योग खूप प्रगतीपथावर असून त्यांच्या मुलाचा देखील त्यांच्या या उद्योगाला खूप मोठा मोलाचा हातभार लागलेला आहे. जर त्यांच्या रेड काऊ डेअरीची दूध विक्री पाहिली तर 32 हजारापासून ते चार लाख लिटर दूध विक्री पर्यंत आहे. पश्चिम बंगाल राज्यातील बारा जिल्ह्यातील तीन लाखांपेक्षा अधिक शेतकरी रेड काऊ डेअरीशी जोडले गेलेले आहेत.

या अगोदर नारायण मुजुमदार जगले खडतर आणि कष्टाचे जीवन

नारायण मुजुमदार हे रेड काऊ डेअरीचे फाउंडर आणि मॅनेजिंग डायरेक्टर असून या कंपनीच्या स्थापने अगोदर त्यांनी अनेक प्रकारचे कष्ट सहन करून हे यश मिळवलेले आहे. स्वतःचा ब्रँड सुरू करण्याअगोदर नारायण मुजुमदार यांनी त्यांच्या कॉलेजचा खर्च बघावा याकरिता पार्ट टाईम दूध विक्री केली. त्यासाठी ते सकाळी पाच ते सात वाजेपर्यंत घरोघरी जाऊन दुधाची विक्री करत होते व त्यातून त्यांना दिवसाला तीन रुपये कमाई होत होती. अनेक वर्ष वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम केले व त्यानंतर नारायण मुजुमदार यांनी 1997 या वर्षी स्वतःचा बिझनेस रेड काऊ डेअरीच्या स्वरूपाने सुरू केला. सुरुवातीला त्यांनी गावागावामध्ये जात दूध कलेक्शन सुरू केले व ते दूध ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी घरोघरी गेलेत. कधी कधी पायी चालून देखील त्यांनी दूध पोचवण्याचे काम केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe