बातमी कामाची ! कर्ज घेण्यासाठी नेमका सिबिल स्कोर किती असावा?, पहा काय म्हणताय तज्ञ

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Cibil Score For Loan : आपल्याला प्रत्येकालाच केव्हा ना केव्हा कर्जाची गरज पडत असते. मग ते कर्ज आपण घर बांधण्यासाठी, वाहन खरेदी करण्यासाठी, लॅपटॉप किंवा इतर तत्सम इलेक्ट्रॉनिक आणि महागड्या वस्तू खरेदी करण्यासाठी, किंवा आपल्या वैयक्तिक गरजांसाठी घेत असतो. जर तुम्ही याआधी कधी कर्ज घेतलं असेल किंवा कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर मग आजची ही बातमी तुम्ही पूर्ण वाचायलाच पाहिजे.

जसं की आपणास ठाऊकच आहे की कर्ज घेताना सिबिल स्कोर हा चेक केला जातो. सिबिल स्कोर हा 300 ते 900 या दरम्यान असतो. हा स्कोर प्रामुख्याने व्यक्तीच्या कर्जाचा इतिहास दर्शवतो. म्हणजे जर एखाद्या व्यक्तीने कर्जाची योग्य पद्धतीने आणि वेळेवर परतफेड केली असेल, त्या व्यक्तीने आपल्या क्रेडिट कार्डचे बिल वेळेवर दिले असेल म्हणजेच एकंदरीत ज्या व्यक्तीचा कर्जाचा व्यवहार हा चांगला असतो अशा व्यक्तीचा सिबिल स्कोर हा चांगला असतो.

हे पण वाचा :- पुण्याच्या शेतकऱ्याचा नादखुळा ! पावणे दोन एकरात सुरू केली आल्याची शेती, मिळाले 18 लाख 50 हजाराचे उत्पन्न, बनलेत लखपती; पहा ही भन्नाट यशोगाथा

मात्र ज्या व्यक्तीने कर्जाची वेळेवर परतफेड केलेली नसेल किंवा इतर अन्य काही चुका संबंधित व्यक्तीच्या माध्यमातून कर्ज फेडताना झाल्या असतील तर अशा व्यक्तीचा सिबिल स्कोर हा कमी असतो. आता प्रश्न असा येतो की चांगला सिबिल स्कोर म्हणजे नेमका किती? तर जाणकार लोक यावर उत्तर देताना सांगतात की ज्या व्यक्तीचा सिबिल स्कोर 750 पेक्षा अधिक असतो अशा व्यक्तींचा Cibil Score चांगला मानला जातो.

मग आता प्रश्न सापडतो की खराब सिबिल स्कोर नेमका किती? वास्तविक कर्ज घेण्यासाठी ज्या व्यक्तींचा सिबिल स्कोर 700 ते 800 दरम्यान असतो अशा व्यक्तींना लवकर कर्ज मंजूर होतं. या व्यक्तींना कमी व्याज दरात देखील कर्ज मंजूर होऊ शकतं. सहसा अशा व्यक्तींना कर्ज बँकेच्या माध्यमातून नाकारले जात नाही. परंतु कर्ज घेण्यासाठी सिबिल हा एक मात्र घटक आहे. अर्ज घेण्यासाठी सिबिल प्रमाणेच अनेक नानाविध घटक किंवा फॅक्टर असतात. जसे की कर्ज घेणाऱ्या व्यक्तीचे उत्पन्न तपासले जाते, त्याचे उत्पन्नाचे पुरावे तपासले जातात आणि मग संबंधित व्यक्तीला कर्ज मंजूर होतं.

हे पण वाचा :- आनंदाची बातमी ! आता वर्सोवावरून समुद्रमार्गे पालघर जाता येणार; प्रवासाचा वेळ येणार निम्म्यावर, पहा कसा असेल मार्ग

पण सिबिल चांगला असला म्हणजेच कर्ज घेण्यासाठी मदत होते असं आपण म्हणू शकतो. दरम्यान ज्या व्यक्तींचा सिबिल स्कोर हा 500 च्या आसपास असतो अशा व्यक्तींना बँकेच्या माध्यमातून कर्ज देताना खूप विचार केला जातो. काही वित्तीय संस्था किंवा बँका अशा व्यक्तींना कर्ज नाकारु देखील शकतात. जर अशा व्यक्तींना कर्ज बँकेच्या माध्यमातून मंजूर जरी झालं तरी देखील ते कर्ज खूप कमी प्रमाणात मंजूर होतं आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अशा व्यक्तींकडून खूपच अधिक व्याजदर या ठिकाणी आकारलं जातं.

काही तज्ञ लोक सांगतात की कर्ज मिळवण्यासाठी कमीत कमी 650 इतका सिबिल स्कोर असणे गरजेचे असते. एकंदरीत पाहता कर्ज घेण्यासाठी नेमका किमान सिबिल स्कोर काय असावा याबाबत फिक्स डेफिनेशन किंवा व्याख्या नाही. मात्र जाणकार लोकांनी ज्या पद्धतीने सांगितले आहे त्यानुसार ज्या व्यक्तींचा सिबिल स्कोर हा 700 पेक्षा अधिक असतो अशा व्यक्तींना कमी व्याजदरात आणि लवकर कर्ज मंजूर होतं. त्यामुळे, आपला सिबिल स्कोर खराब होऊ नये यासाठी प्रत्येक व्यक्तीने आपल्या

हे पण वाचा :- स्कायमेट वेदरचा अंदाज आला रे…! यंदा कसा असणार मान्सून? अल निनो राहणार का? पहा काय म्हणतंय Skymet Weather