खरं काय ! सिबिल स्कोर कितीही खराब असला तरीही ‘या’ पद्धतीने सहज मिळणार कर्ज; वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Cibil Score : आपल्यापैकी अनेकांना आपल्या वेगवेगळ्या गरजा पूर्ण करण्यासाठी कर्ज घ्यावे लागते. जसं की पर्सनल लोन, वेहिकल लोन, होम लोन इत्यादी प्रकारचे कर्ज आपण घेतो. कर्ज घेताना मात्र आपला सिबिल स्कोर बँकेकडून विचारला जातो. जस की आपणास ठाऊकच आहे सिबिल स्कोर हा 300 ते 900 दरम्यान गणला जातो. यापैकी 750 पेक्षा जास्त सिबिल स्कोर किंवा क्रेडिट स्कोर असलेल्या व्यक्तीला लवकर कर्ज उपलब्ध होतं.

तर 750 पेक्षा कमी स्कोर असला तर सिबिल खराब असल्याचे सांगितले जाते. अशा व्यक्तींना कर्ज काढताना नानाविध अडचणींचा सामना करावा लागतो. बँकेकडून कर्ज नाकारल देखील जात. दरम्यान आज आपण कमी सिबिल स्कोर असेल तर कसं कर्ज मिळवता येऊ शकतं याविषयी थोडक्यात जाणून घेणार आहोत.

तज्ञ लोकांच्या मते जर तुमचा सिबिल स्कोर कमी असेल तर बँकांना तुमच्या उत्पन्नाचा आणि वेतनाचा पुरावा दाखवा. बँकांना तुम्ही कर्ज परतफेड करण्यास सक्षम आहात हे पटवून द्या. जर तुमच उत्पन्न किंवा वेतन जर चांगले असेल तर क्रेडिट स्कोर खराब असताना देखील बँकांकडून कर्ज मंजूर होऊ शकत.

क्रेडिट स्कोर खराब असला तर बँका कर्ज देण्यास निश्चितच टाळाटाळ करू शकतात. अशा परिस्थितीत तुम्ही कर्ज आवश्यक असल्यास बँकेकडे न जाता एनबीएफसी कडे जा. NBFC कमी सिबिल असला तरी देखील कर्ज देतं मात्र व्याजदर या ठिकाणी अधिक द्यावा लागणार आहे.

या सोबतच तज्ञ लोक सांगतात की, जर तुमचा क्रेडिट स्कोर कमी असेल तर तुम्ही नेहमी कमी कर्जासाठी अप्लाय केलं पाहिजे. कमी लोन जर तुम्ही घेत असाल तर जोखीम कमी म्हणून बँकांकडून कर्ज मंजूर होऊ शकतं. तसेच कमी कर्ज घेऊन तुम्ही त्या कर्जाची व्यवस्थित रित्या परतफेड करून आपला सिबिल देखील सुधारू शकणार आहात.

तज्ञ लोक सांगतात की, जर सिबिल स्कोर लो असेल तर जॉईंट कर्जाचा पर्याय तुमच्यासाठी उत्तम ठरू शकतो. किंवा कमी सिबिलवाले ज्या व्यक्तीचा सिबिल स्ट्रॉंग आहे अशा व्यक्तींना गॅरंटर बनवून कर्ज मिळवू शकतात.

यासोबतच काही फायनान्शिअल कंपन्या अलीकडे सॅलरी ऍडव्हान्सच्या स्वरूपात कर्ज उपलब्ध करून देतात. अशा प्रकारच्या कर्जामध्ये मात्र तुमच्या वेतनातून अर्धी रक्कम संबंधित कंपन्यांकडून वसुलीदरम्यान कापली जाते.

ज्यांचा सिबिल स्कोर खराब असेल त्या व्यक्तींसाठी मात्र गोल्ड लोन हा एक अतिशय देशील पर्याय राहणार आहे. गोल्ड लोन म्हणजेच सोनं तारण ठेवून जे कर्ज आपण घेतो त्यासाठी सहसा सिबिल स्कोर एवढा मॅटर करत नाही. यामध्ये सोन्याच्या सध्याच्या किमतीच्या 75 टक्के इतकी रक्कम कर्ज स्वरूपात संबंधितांना मिळू शकते.

जर एखाद्या व्यक्तीची बँकेत एफडी असेल तर एफडीवर देखील कर्ज मिळत असतं. म्हणजे Fixed Deposit च्या बदल्यात कर्ज बँका, पोस्ट बँककडून मिळत.

याशिवाय विमा पॉलिसीवर देखील कर्ज मिळू शकतं. यासाठी संबंधित व्यक्तीची पॉलिसी ही बँकेच्या नावाने असाइन करावी लागते. जेव्हा कर्जाची परतफेड होत असते तेव्हा बँक संबंधित व्यक्तीच्या नावावर ती पॉलिसी रीअसाईन करतात.