शेतकऱ्यांनो चिंता नसावी; ‘या’ 6 कारणामुळे कापूस दर वाढणार; तज्ञांचा अंदाज, पण…..

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Cotton Rate Will Hike : कापूस हे महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात उत्पादित केल जाणार एक मुख्य नगदी पीक आहे. याची शेती राज्यातील मराठवाडा विदर्भ आणि खानदेशात सर्वाधिक केली जाते. पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यातही अलीकडे या पिकाची लागवड वाढली आहे. शिवाय गेल्या अंगामात कापसाला 12 हजारापर्यंतचा दर मिळाला होता यामुळे यंदा याची लागवड किंचित वाढली आहे. लागवड वाढली मात्र अतिवृष्टी आणि गुलाबी बोन्ड अळीमुळे कापूस उत्पादन घटले.

जवळपास ऑक्टोबर 2022 मध्येच म्हणजे कापूस हंगाम सुरू होण्याच्या अगदी सुरुवातीलाच कापूस उत्पादकांनी कापूस उत्पादन घटणार असा अंदाज व्यक्त केला होता. शेतकऱ्यांच्या या अंदाजावर मात्र उद्योगांकडून आक्षेप नोंदवला गेला आणि जाणून बुजून उत्पादन वाढेल असा आव आणला आणि दर मुद्दामून दबावात आणण्याचा प्रयत्न झाला. मात्र गेल्या वर्षीचा कापूस उत्पादनाचा तुटवडा आणि यावर्षी देखील कापूस उत्पादन कमी झाले यामुळे भविष्यात भाव वाढतील या आशेने कापूस उत्पादकांनी कापसाची विक्री सुरुवातीच्या टप्प्यात कमी केली.

हे पण वाचा :- महिलांना सरकार देते 6,000 रुपये; थेट बँक खात्यात जमा होते रक्कम, पिंपरी चिंचवड मधील तब्बल 57 हजार महिलांनी घेतला लाभ, तुम्ही आहात का पात्र? पहा….

हेच कारण होते की नोव्हेंबर महिन्याच्या सुमारास कापसाला नऊ हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा सरासरी दर मिळाला. नोव्हेंबर मध्ये कापसाची आवक कमी होती, डिसेंबर आणि जानेवारीमध्ये देखील कापूस आवक कमीच होती. मात्र फेब्रुवारी अन मार्च महिन्यात शेतकऱ्यांना पैशांची निकड भासली परिणामी कापसाची या दोन महिन्यात विक्रमी आवक झाली. याचा परिणाम म्हणून कापसाचे दर कमी झाले. जागतिक बाजारात देखील बँकिंग क्षेत्रात आलेल्या संकटामुळे कापूस दर कमी झाले.

या दुहेरी कारणाने कापसाला देशांतर्गत खूपच कमी भाव मिळू लागला. यामुळे शेतकरी अजूनच घाबरला परिणामी बहुतांशी शेतकऱ्यांनी कापसाची विक्री करून टाकली. मात्र ही परिस्थिती अधिक काळ राहणार नाही असा तज्ञांचा अंदाज होता आणि त्यानुसार आता गेल्या काही दिवसांपासून दरात थोड्याफार प्रमाणात वाढ होत आहे. देशात 313 लाख कापूस गाठी उत्पादन होण्याचा अंदाज आहे.

हे पण वाचा :- मराठमोळ्या शेतकऱ्याचा मिश्र शेतीचा प्रयोग यशस्वी; एकाच जमिनीत केली शेवगा, वांगी आणि कांदापात लागवड, पहा हा भन्नाट प्रयोग

यापैकी बाजारात 200 लाख कापूस गाठी बाजारात आली असून उर्वरित कापूस गाठी बाहेर आहे. मात्र या उर्वरित कापसापैकी फारच थोड्या प्रमाणात कापूस शेतकऱ्यांकडे शिल्लक आहे. व्यापारी, स्टॉकिस्ट आणि जिनिंग उद्योगाकडे मात्र आता कापूस मोठ्या प्रमाणात शिल्लक आहे. त्यामुळे दरवाढ होण्याचा अंदाज तज्ञ लोकांचा असला तरी देखील याचा फायदा शेतकऱ्यांना किती होतो हाच मोठा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

दरम्यान पुढील दोन ते तीन आठवडे कापूस बाजारात आवकेचा दबाव राहणार आहे. यानंतर मात्र कापूस दर वाढीसाठी आणखीनच पोषक परिस्थिती तयार होणार आहे. यामुळे सध्या मिळत असलेल्या दरात आगामी दोन ते तीन आठवड्यात दरवाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान आता आपण दरवाढीची नेमके कारणे काय आहेत याबाबत थोडक्यात जाणून घेऊया.

हे पण वाचा :- ‘या’ भागात पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस पडणार; गारपिट पण होणार, भारतीय हवामान विभागाचा इशारा

दरवाढीची कारणे खालील प्रमाणे 

जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार यंदाच्या हंगामात देशात कापूस उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे, शेतकऱ्यांकडे आता खूपच कमी स्टाॅक आहे, येत्या हंगामात कापूस लागवड कमी होण्याचा अंदाज आहे, आंतरराष्ट्रीय पातळीवरही लागवड घटण्याची शक्यता आहे, देशातील उद्योगांची क्षमता वाढली परिणामी कापसाचा देशांतर्गत वापर वाढत आहे, बांगलादेशसह शेजारच्या देशांमध्ये कापूस उत्पादन घटले आहे, देशातील लग्नसराई आणि समारंभामुळे कापडाला उठाव आहे, या सर्व कारणांमुळे आता पुढील दोन ते तीन आठवड्यानंतर दरवाढ होण्यासाठी पोषक परिस्थिती आहे.

हे पण वाचा :- ब्रेकिंग ! ‘या’ प्रकल्पामुळे ठाणे ते डोंबिवली प्रवास फक्त 20 मिनिटात होणार; ‘या’ वेळी होणार उद्घाटन, मुख्यमंत्रीपुत्र खासदार श्रीकांत शिंदेची माहिती