शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! आता डीएपी मात्र 600 रुपयात मिळणार, केंद्र सरकारने लॉन्च केले नवीन डीएपी, पहा…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

DAP Fertilizer Rate : शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. आता शेतकऱ्यांना डीएपी खत मात्र सहाशे रुपये मिळणार आहे. पिकाच्या वाढीसाठी अति महत्त्वाचे असलेले हे खत आता शेतकऱ्यांना स्वस्त दरात मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. वास्तविक आता बाजारात नॅनो DAP आले आहे. इफ्फ्कोने हे द्रवरुप डीएपी विकसित केले आहे.

आधी इफ्फ्कोने नॅनो युरिया विकसित केला होता आता नॅनो डीएपी विकसित केले असून या नॅनो डीएपीला केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांनी नुकतेच लॉन्च केले आहे. 26 एप्रिल 2023 रोजी अमित शहा यांच्या हस्ते Nano DAP या द्रवरुप खताचे लोकार्पण करण्यात आले आहे. म्हणजे आता शेतकऱ्यांना 50 किलोच्या डीएपी ची बॅग खरेदी करण्याची गरज राहणार नाही.

हे पण वाचा :- मानलं गुरुजी ! शिक्षकाच्या नोकरीला ठोकला राम-राम सुरु केली शेती; फुलशेतीतून कमवताय दिवसाला 3 हजार, वाचा ही यशोगाथा

50 किलोचा डीएपीच्या बॅगेचा जेवढा रिझल्ट आहे तेवढाच रिझल्ट 500 ml च्या नॅनो डीएपीच्या बाटलीचा राहणार आहे. यामुळे शेतकऱ्यांचा खर्चात बचत होणार आहे. यामुळे शेतकऱ्याना डीएपीसाठी करावा लागणारा खर्च वाचेल. शिवाय यामुळे जमिनीची सुपीकता अबाधित राहील आणि पीक उत्पादनात वाढ होईल असे मत तज्ञांच्या माध्यमातून व्यक्त होत आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की या ज्ञानो डीएपी ला गेल्या महिन्यात केंद्रीय कृषिमंत्रालयाने वापरासाठी अधिकृत मान्यता दिली आहे. आता इफकोच्या नॅनो डीएपीला अमित शहा यांच्या हस्ते लाँच करण्यात आले आहे. यामुळे आता हे द्रवरुप खत शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे.

हे पण वाचा :- मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी; मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाचा ‘हा’ महत्त्वाचा टप्पा पूर्ण, ‘या’ महिन्यात सुरू होणार एमटीएचएल प्रकल्प

शेतकऱ्यांच्या खर्चात होणार बचत 

वास्तविक, नॅनो डीएपीची 500 मिलीची एक बाटली ५० किलोच्या पारंपरिक दाणेदार डीएपी खताच्या समतुल्य राहणार असल्याची माहिती इफकोच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. म्हणजे 50 किलोची गोण वापरण्याऐवजी केवळ 500ml ची बाटली फवारल्याने DAP ची गरज भागवता येणार आहे. आता यामुळे साहजिकच शेतकऱ्यांचा मोठा पैसा वाचणार आहे. पारंपरिक दाणेदार डीएपीच्या एका गोणीसाठी शेतकऱ्यांना जवळपास १३५० रुपयाचा खर्च येतो.

पण, नॅनो डीएपीच्या एका 500 ml च्या बाटलीची किंमत केवळ ६०० रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. साहजिकच शेतकऱ्याचा निम्म्याहून अधिक खर्च वाचणार आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात बचत होईल आणि उत्पादनात भरीव वाढ होईल असं मत तज्ञांनी व्यक्त केले असून जमिनीची सुपीकता देखील यामुळे कायम ठेवता येऊ शकते.

हे पण वाचा :- चमत्कार झाला ! गाईने दिला ‘सिंहाच्या बछड्याला’ जन्म; बछड्याला पाहण्यासाठी नागरिकांची तोबा गर्दी, पहा Photo