तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ! दूरदर्शन मध्ये ‘या’ पदासाठी निघाली भरती; पगार तब्बल 40 हजार पार, वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Doordarshan Recruitment 2023 : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. दूरदर्शन मध्ये काही रिक्त पदाच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. यामुळे नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी ही एक सुवर्णंसंधी राहणार आहे. दूरदर्शन या सरकारी संस्थेने व्हिडिओ ग्राफर या रिक्त पदासाठी नुकतीच भरती जाहीर केली आहे.

यासाठीचे अधिसूचना देखील दूरदर्शनने नुकतीच जारी केली आहे. अशा परिस्थितीत जर आपल्याकडे व्हिडिओग्राफीचे कौशल्य असेल आणि तुम्ही त्यासंबंधित शिक्षण घेतलेले असेल तर आपल्यासाठी ही एक सुवर्णसंधी राहणार आहे. दरम्यान आज आपण दूरदर्शन ने काढलेल्या या भरतीबाबत सर्व आवश्यक माहिती थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

हे पण वाचा :- मुंबईकरांनो, कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो मार्गाचा पहिला टप्पा ‘या’ महिन्यात सुरू होणार; आतापर्यंत 2 मेट्रो मुंबईमध्ये दाखल, तिसरी गाडीही लवकरच येणार, पहा…

कोणत्या आणि किती रिक्त पदांसाठी आहे भरती?

व्हिडिओग्राफर या पदाची भरती होणार असून एकूण 41 रिक्त पदांसाठी ही भरती आयोजित राहणार आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता?

या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार हा किमान 12 वी उत्तीर्ण असावा. यासोबतच सदर उमेदवाराकडे सिनेमॅटोग्राफी/ व्हिडिओग्राफी या विषयात पदविका किंवा पदवी असणे आवश्यक आहे. तसेच व्हिडिओग्राफि क्षेत्रातील किमान पाच वर्षाचा अनुभव आवश्यक आहे.

वयोमर्यादा?

दूरदर्शन ने काढलेल्या या भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार हा 40 वर्षांपेक्षा अधिक वयाचा नसावा.

पगार किती मिळणार

निवड झालेल्या उमेदवाराला चाळीस हजार रुपये प्रति महिना मानधन मिळणार आहे.

हे पण वाचा :- पंजाबरावांचा तातडीचा मॅसेज ! 25 एप्रिल ते 27 एप्रिल राज्यातील ‘या’ भागात गारपीट होणार; आणखी काय म्हटले डख, पहा…

कशी होणार निवड प्रक्रिया?

बेसिक टेस्ट आणि मुलाखतीच्या माध्यमातून या पदासाठी उमेदवारांची निवड होणार असून बेसिक टेस्टमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांनाच पुढील प्रक्रियेसाठी आमंत्रित केले जाणार आहे. 

अर्ज कसा करायचा?

यासाठी इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करायचा असून दूरदर्शनच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन उमेदवार आपला अर्ज सादर करू शकणार आहेत.

अर्ज करण्याची अंतिम दिनांक?

मिळालेल्या माहितीनुसार तीन मे 2023 पर्यंत या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. विहित कालावधीमध्ये आलेल्या अर्जावरच विचार केला जाणार आहे यामुळे उमेदवारांनी लवकरात लवकर आपला अर्ज सादर करायचा आहे.

हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी ! तुरीच्या दरात विक्रमी वाढ ; आणखी ‘इतके’ वाढणार भाव, पहा काय म्हणताय जाणकार