कौतुकास्पद ! पूणे जिल्ह्यातील प्रयोगशील शेतकऱ्याने एका एकरात आईसबर्ग पिकाची केली लागवड, मिळाले दीड लाखांचे उत्पन्न; परिसरातला पहिलाच प्रयोग

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Farmer Success Story : गेल्या काही वर्षात शेतीत शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. नैसर्गिक संकटांसोबतच शेतकऱ्यांना सुलतानी संकटांचा देखील मोठा फटका बसत आहे. अवकाळी अतिवृष्टी गारपीट ढगाळ हवामान चक्रीवादळ यांसारख्या नैसर्गिक संकटांमुळे पीक उत्पादनात घट तर होतच आहे शिवाय उत्पादित केलेल्या शेतमालाला बाजारात अपेक्षित असा दर मिळत असल्याने शेतकऱ्यांसाठी शेती व्यवसाय हा आतबट्ट्याचा सिद्ध होत आहे.

यामुळे आता नवयुवक शेती नको रे बाबा असं ओरड करत आहेत. मात्र असे असले तरी राज्यात असेही अनेक नवयुवक आहेत त्याचे शेतीमध्ये नाविन्यपूर्ण प्रयोग राबवत लाखो रुपयांची कमाई करत आहेत. नवनवीन पिकांचीं अलीकडे शेतकरी लागवड करत आहेत. विशेष म्हणजे या पिकातून शेतकऱ्यांना चांगली कमाई देखील होत आहे.

पुणे जिल्ह्यातही असाच एक नवीन प्रयोग पाहायला मिळत आहे. खरं पाहता जिल्ह्यातील प्रगतीशील शेतकरी कायमच वेगवेगळ्या प्रयोगाच्या माध्यमातून आपले वेगळेपण सिद्ध करत आहेत. दरम्यान आता जिल्ह्यातील इंदापूर तालुक्याच्या निमसाखर येथील शेतकऱ्याने आईसबर्ग पिकाच्या लागवडीचा नवखा प्रयोग केला आहे. तालुक्यात आईसबर्ग पिकाची लागवड पहिल्यांदाच झाल्याचे सांगितले जात असून तरीही या पिकातून या शेतकऱ्याने लाखो रुपयांची कमाई केली आहे.

नितीन लक्ष्मण खोमणे नामक शेतकऱ्याने हा प्रयोग केला आहे. या शेतकऱ्याकडे एकूण पाच एकर दहा गुंठे शेत जमीन आहे. ते आपल्या शेतात कायमच नवनवीन प्रयोग करत असतात. असाच नवीन प्रयोग म्हणून त्यांनी आपल्या एक एकर शेत जमिनीत आईसबर्ग पिकाची शेती सुरू केली. यासाठी त्यांना त्यांच्या मित्राने मार्गदर्शन केले. नितीन यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी फलटण येथून या पिकाची रोपे मागवटी. एक रुपये वीस पैसे प्रतिरोप याप्रमाणे रोग त्यांनी मागवले.

रोपं मागवल्यानंतर जमिनीची मशागत करून बेड तयार करण्यात आले. यानंतर मल्चिंग पेपर अंथरून रोपे लावण्यात आली. विशेष म्हणजे पाणी व्यवस्थापनासाठी त्यांनी ठिबक सिंचन प्रणालीचा वापर केला. नितीन यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांना लागवडीपासून ते आत्तापर्यंत 35 हजार रुपयांचा खर्च आला आहे. लागवड केल्यानंतर पीक व्यवस्थापनाच्या सर्व बाबी काळजीपूर्वक जोपासण्यात आले आहेत. पिकाला टॉनिक देखील देण्यात आले आहे.

यामुळे पिकाची वाढ जोमदार झाली आहे. येत्या काही दिवसात या पिकापासून प्रत्यक्ष उत्पादन मिळणार असून एकरी तीन टन एवढे उत्पादन त्यांना येणार आहे. खोमणे यांनी सांगितल्याप्रमाणे येत्या दहा दिवसात हे पीक काढण्यासाठी तयार होईल आणि त्यांना यातून सव्वा ते दीड लाखाच उत्पन्न मिळणार आहे.