पांढऱ्या टरबूज लागवडीचा यशस्वी प्रयोग; 70 दिवसांत अर्ध्या एकरात झाली दीड लाखांची कमाई, कोणत्या जातीची केली लागवड?, पहा….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Farmer Success Story : पारंपारिक पिकांच्या शेतीमध्ये सातत्याने उत्पादन खर्चात वाढ होत आहे. कृषी निविष्ठांच्या किमती आकाशाला गवसणी घालत आहेत. सोबतच इंधनाच्या, खतांच्या किंमती, मजुरीचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे आता शेती व्यवसायातुन शेतकऱ्यांना अपेक्षित अशी कमाई नसल्याचे चित्र आहे.

परिणामी आता शेतकऱ्यांनी पारंपारिक पिकांमध्ये बदल करत नवनवीन पिकांची शेती सुरू केली आहे. असाच एक बदल नासिक जिल्ह्यातील कसमादे पट्ट्यात पाहायला मिळाला आहे. खरं पाहता कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा अर्थातच कसमादे पट्टा कांदा उत्पादनासाठी संपूर्ण महाराष्ट्रात ओळखला जातो.

याशिवाय या भागात डाळींबाचेही मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. तसेच काही प्रयोगशील शेतकरी या ठिकाणी द्राक्ष या फळबाग पिकाचीही मोठ्या प्रमाणात शेती करतात. याव्यतिरिक्त या भागात भाजीपाला आणि कलिंगड सारख्या हंगामी पिकांची देखील मोठ्या प्रमाणात शेती होते.

हे पण वाचा :- पुण्याच्या शेतकऱ्याचा नादच खुळा! खडकाळ माळरानावर फुलवली द्राक्षाची बाग; 11 एकरात मिळवला तब्बल 75 लाखाचा निव्वळ नफा, पहा…

आतापर्यंत मात्र कसमादे पट्ट्यात काळपट रंगाच्या टरबुजाचीच लागवड पाहायला मिळाली आहे. परंतु येथील खामखेडा गावातील प्रयोगशील शेतकऱ्याने तेलंगणामध्ये उत्पादित होणाऱ्या पांढऱ्या पट्टेदार टरबूज पिकाची लागवड केली आहे. विशेष म्हणजे या पिकातून मात्र वीस गुंठ्यात या प्रयोगशील शेतकऱ्याला दीड लाखांची कमाई झाली आहे.

खामखेडा येथील दौलत श्रावण मोरे यांनी हा प्रयोग केला आहे. वास्तविक दौलत मोरे गेल्या अनेक वर्षांपासून टरबूज लागवड करत आहेत. आतापर्यंत ते देखील काळपट टरबुजाची लागवड करायचे पण त्यांचे चिरंजीव यांनी उन्हाळ्यात सर्वाधिक मागणी कोणत्या टरबुजाला असते याचा शोध घेतला.

यावेळी त्यांना पट्टेदार नामधारी टरबूज बाबत माहिती मिळाली. मग काय त्यांनी या टरबुजाची आपल्या वीस गुंठे शेत जमिनीत लागवड केली. लागवड केल्यानंतर पीक व्यवस्थापनाच्या सर्व बाबी काळजीपूर्वक करण्यात आल्या.

हे पण वाचा :- राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू होणार नाही; पण OPS मधील ‘या’ तरतुदी लागू केल्या जातील, पहा….

यामुळे टरबुजाच्या या जातीची शेती जरी नवखी असली तरी देखील त्यांना यातून विक्रमी उत्पादन मिळाले. विद्राव्य खतांची मात्रा योग्यरीत्या मिळाली असल्याने टरबुजाचे एक फळ साधारणतः दहा किलो पर्यंत भरले आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या तोडणीत जवळपास 15 टन माल त्यांना मिळाला आहे.

अजूनही दोन नंबरचा माल वावरात पडून आहे. एक नंबरच्या टरबुजाला 11 रुपये प्रति किलोचा भाव मिळाला असून खर्च वजा जाता जवळपास दीड लाखांची कमाई त्यांना झाली आहे. अजूनही माल निघणार असल्याने उत्पन्नाचा हा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

अर्धा एकर शेत जमिनीसाठी त्यांना जवळपास 25 हजाराचा खर्च आला आहे. निश्चितच टरबुजाचे पीक मात्र 70 दिवसात काढण्यासाठी तयार होते. यामुळे मात्र 70 दिवसात वीस गुंठ्यात दीड लाखांची कमाई करत या प्रयोगशील शेतकऱ्यांनी इतरांसाठी मार्गदर्शक असं काम केलं आहे.  

हे पण वाचा :- उच्चशिक्षित तरुणांचा शेतीमध्ये हटके प्रयोग! कलिंगड अन खरबूज पिकाच्या शेतीतून मात्र 70 दिवसात मिळवले लाखोंचे उत्पन्न, पहा…..