अहो शेठ तुम्ही नादच केलाय थेट ! प्रगतिशील शेतकऱ्याने ‘या’ फळाच्या अवघ्या 30 झाडामधून कमवलेत लाखों रुपये, वाचा ही यशोगाथा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Farming Success Story : गेल्या काही वर्षांपासून शेतीमध्ये मोठा बदल केला जात आहे. विशेषतः पिकपद्धतीत बदल केला जात आहे. आता शेतकऱ्यांनी नवनवीन नगदी आणि फ़ळबाग पिकाच्या शेतीतून चांगली कमाई साधली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील असाच एक नवीन प्रयोग पाहायला मिळत आहे.

पुसद तालुक्यातील एका प्रगतिशील शेतकऱ्याने चक्क फणस शेती यशस्वी करून दाखवली आहे. वास्तविक, फणस म्हटलं की सर्वप्रथम डोळ्यापुढे उभे राहतात ते कोकणाच चित्र. फणसची शेती प्रामुख्याने कोकणात केली जाते. मात्र यवतमाळ जिल्ह्यातील या शेतकऱ्याने कोकणातील फणस चक्क विदर्भात उत्पादित करून दाखवले आहे. यामुळे सध्या या प्रयोगशील शेतकऱ्याची सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे.

हे पण वाचा :- काय सांगता ! ‘या’ कंपनीच्या स्टॉकने फक्त 3 वर्षात दिले 1000 टक्क्यांहुन अधिकचे रिटर्न, गुंतवणूकदार बनलेत मालामाल, पहा….

तालुक्यातील चिलवाडी येथील बंडू जाधव या प्रयोगशील शेतकऱ्याने ही किमया साधली आहे. जाधव यांनी आपल्या बारा गुंठ्यात फणसची 30 झाडे लावली आहेत. आता या 30 झाडांमधून दरवर्षी जाधव यांना सव्वा लाखाची कमाई होत आहे. फणस पिकामुळे त्यांना शाश्वत उत्पन्न मिळत आहे. बंडू यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे 15 एकर जमीन आहे.

या जमिनीत ते पारंपारिक पिकासोबतच फ़ळबाग पिकांची देखील शेती करतात. पंधरा वर्षांपूर्वी त्यांनी आपल्या बारा गुंठ्यात 50 ची 30 झाडे लावली होती. फणस लावल्यानंतर पाच वर्षांनी यातून उत्पादन मिळण्यास सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे या पिकासाठी कोणत्याही फवारणीची गरज राहत नाही. तसेच यामध्ये आंतर पिकाची देखील शेती त्यांनी काही काळ केली आहे. म्हणजेच आंतरपीकातून देखील त्यांना चांगली कमाई झाली आहे.

हे पण वाचा :- तरुणांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ जिल्हा परिषदेत 612 रिक्त पदांसाठी होणार भरती; वाचा सविस्तर

विशेष बाब म्हणजे त्यांनी उत्पादीत केलेले फणस विकण्यासाठी त्यांना कुठेही भटकावे लागत नाही. कारण की व्यापारी स्वतः त्यांच्या बांधावर येतात आणि या मालाची खरेदी करून घेऊन जातात. निश्चितच पारंपारिक पिकांसोबतच शेतकऱ्यांनी आता असे काही नवीन प्रयोग देखील करणे जरुरीचे बनले आहे.

या अशा प्रयोगामुळे शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्न मिळू शकते असा आशावाद बंडू जाधव यांनी व्यक्त केला आहे. एकीकडे विदर्भातील शेतकरी सातत्याने नैसर्गिक आपत्तीमुळे नापिकीचा सामना करत आहेत. मात्र, जाधव यांनी अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये देखील विदर्भात फणसचा मळा फुलवला असल्याने हे काम इतरांसाठी मार्गदर्शक राहणार आहे एवढे नक्की.

हे पण वाचा :- अहमदनगरमध्ये नोकरीची संधी ! आर्मी पब्लिक स्कूलमध्ये ‘या’ पदासाठी भरती सुरू, वाचा सविस्तर