Gold Price Today : सोन्याच्या किमतीत गेल्या काही दिवसांपासून सतत मोठा बदल पहायला मिळतोय. आज सुद्धा सोन्याच्या किमतीत असाच एक महत्त्वाचा बदल झाला आहे. गेल्या पाच दिवसांपासून सोन्याच्या किमती सतत घसरत आहेत पण आज सोन्याच्या किमतीत पुन्हा एकदा मोठी वाढ दिसून आली आहे.
यामुळे सर्वसामान्य ग्राहकांची चिंता वाढली आहे तर दुसरीकडे या वाढीचा सोन्यात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना थोडासा दिलासा मिळणार आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की पाच दिवसांपूर्वी अर्थातच 6 जून 2025 रोजी 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत 99 हजार 600 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी नमूद करण्यात आली होती मात्र सात जूनला 24 कॅरेट शुद्ध सोन्याच्या किमतीत दहा ग्रॅम मागे चक्क 1630 रुपयांनी कमी झाल्यात.
8 जून रोजी किमती कायम राहिल्यात मात्र नऊ जूनला 24 कॅरेट शुद्ध सोन्याच्या किमतीत पुन्हा एकदा 280 रुपयांची घसरण झाली. काल 10 जून 2025 रोजी पुन्हा एकदा 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत 110 रुपयांनी कमी झाली.
आज मात्र सोन्याच्या किमतीत वाढीचा ट्रेंड पाहायला मिळाला असून आजच्या म्हणजेच 11 जून 2025 रोजीच्या 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याच्या किमती आता आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत.
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील 24 कॅरेट सोन्याचे रेट
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, कोल्हापूर, जळगाव : या शहरांमध्ये आज 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत 820 रुपयांनी वाढली आहे. 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत 98 हजार चारशे रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी नमूद करण्यात आली आहे.
नाशिक, लातूर, वसई विरार, भिवंडी : या शहरांमध्ये आज 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत 820 रुपयांनी वाढली आहे. 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत 98 हजार 430 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी नमूद करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील 22 कॅरेट सोन्याचे रेट
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, कोल्हापूर, जळगाव : या शहरांमध्ये आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 750 रुपयांनी वाढली आहे. 22 कॅरेट सोन्याची किंमत 90 हजार 200 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी नमूद करण्यात आली आहे.
नाशिक, लातूर, वसई विरार, भिवंडी : या शहरांमध्ये आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 750 रुपयांनी वाढली आहे. 22 कॅरेट सोन्याची किंमत 90 हजार 230 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी नमूद करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील 18 कॅरेट सोन्याचे रेट
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, कोल्हापूर, जळगाव : या शहरांमध्ये आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 610 रुपयांनी वाढली आहे. 18 कॅरेट सोन्याची किंमत 73 हजार 800 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी नमूद करण्यात आली आहे.
नाशिक, लातूर, वसई विरार, भिवंडी : या शहरांमध्ये आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 610 रुपयांनी वाढली आहे. 18 कॅरेट सोन्याची किंमत 73 हजार 830 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी नमूद करण्यात आली आहे.