सरकारी कर्मचाऱ्यांची झाली चांदी ! राज्य शासनाने चक्क 8% महागाई भत्ता वाढवला, शासन निर्णयही निघाला, वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Government Employee News : सरकारी कर्मचाऱ्यांना शासनाच्या माध्यमातून वर्षातून दोनदा महागाई भत्ता वाढीचा लाभ दिला जातो. गेल्या काही दिवसांपूर्वी केंद्र शासनाने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा चार टक्के डीए वाढवला आहे. या निर्णयामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना 42 टक्के दराने महागाई भत्ता मिळत आहे.

याआधी केंद्रीय कर्मचाऱ्यांना 38 टक्के दराने महागाई भत्ता मिळत होता. तो आता 42 टक्के एवढा बनला आहे. केंद्र शासनाच्या या निर्णयानंतर अनेक राज्य शासनाने आपल्या राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांचा हितासाठी डीएवाढीचा निर्णय घेतला आहे.

अलीकडेच तामिळनाडू राज्य सरकारने आपल्या राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांचा डीए चार टक्क्यांनी वाढवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. हिमाचल प्रदेश, राजस्थान आणि आसाम या राज्यातील राज्य शासनाने देखील तेथील कर्मचाऱ्यांच्या हितासाठी 3% डीए वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

हे पण वाचा :- मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी; सिडको तब्बल 65 हजार घरांची सोडत काढणार, ‘या’ भागातील घरांचा राहणार समावेश, पहा….

दरम्यान, गुजरात सरकारने देखील आपल्या राज्याच्या राज्य कर्मचाऱ्यांसाठी 8% डीए वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. हो बरोबर ऐकताय तुम्ही गुजरात येथील राज्य कर्मचाऱ्यांचा DA आठ टक्क्यांनी वाढला आहे.

मात्र हा DA दोन टप्प्यातील आहे. म्हणजेच एक जुलै 2022 पासून 4% डीए वाढवण्यात आला आहे तर 1 जानेवारी 2023 पासून चार टक्के डीए वाढवण्यात आला आहे.

गुजरात राज्य शासनाने घेतलेला हा निर्णय निश्चितच तेथील कर्मचाऱ्यांच्या हिताचा असून या निर्णयाचा गुजरातमधील साडेनऊ लाख सरकारी कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. याबाबत गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शन धारकांना यामुळे मोठा दिलासा मिळणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

हे पण वाचा :- मोठी बातमी ! प्रस्तावित नागपूर-हैदराबाद वंदे भारत एक्सप्रेसला ‘या’ महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर मिळणार थांबा, पहा…

दरम्यान गुजरात राज्य सरकारने महागाई भत्ता वाढ दिल्यानंतर महाराष्ट्रात महागाई भत्ता वाढ केव्हा लागू होईल? हा प्रश्न राज्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून उपस्थित केला जात आहे. अशातच या संदर्भात एक महत्त्वाची माहिती हाती आली आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्य शासनाच्या सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढीचा निर्णय पुढील महिन्यात म्हणजेच जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतला जाणार आहे.

तसेच ही वाढ जानेवारी 2023 या महिन्यापासून लागू होणार असून याचा प्रत्यक्ष रोखीने लाभ जून महिन्याच्या वेतनासोबत दिला जाणार असल्याचे वृत्त समोर आले आहे.

हे पण वाचा :- राम भक्तांसाठी खुशखबर ! ‘या’ तारखेला खुले होणार अयोध्येतील भव्य राम मंदिर, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची मोठी माहिती