पदवीधर उमेदवारांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ विद्यापीठात निघाली विविध पदांसाठी भरती, वाचा याविषयी सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Government Job : नोकरीच्या शोधात असलेल्यासाठी आजची ही बातमी विशेष आनंदाची राहणार आहे. विशेषतः ज्यांना विद्यापीठात नोकरी करायची असेल अशांसाठी ही बातमी खास आहे. कारण की मुंबई विद्यापीठात नुकतीच एक भरती आयोजित झाली आहे.

याच्या माध्यमातून विद्यापीठातील विविध रिक्त पदे भरली जाणार आहेत. यासाठीची अधिसूचना मुंबई विद्यापीठाने नुकतीच निर्गमित देखील केली आहे. दरम्यान आज आपण या भरतीबाबत आवश्यक सर्व माहिती थोडक्यात जाणून घेऊया.

कोणत्या पदासाठी होणार आहे भरती

संचालक (परीक्षा आणि मूल्यमापन मंडळ), संचालक (इनोव्हेशन इंक्युबॅशन आणि लिंकेज), मुख्य कार्यकारी अधिकारी अर्थातच सीईओ या तीन पदासाठी ही भरती राबवली जात आहे.

हे पण वाचा :- चमत्कार झाला ! गाईने दिला ‘सिंहाच्या बछड्याला’ जन्म; बछड्याला पाहण्यासाठी नागरिकांची तोबा गर्दी, पहा Photo

किती पदांसाठी होणार भरती?

वर नमूद केलेल्या तिन्ही पदांसाठी प्रत्येकी एक अशा एकूण तीन रिक्त पदांसाठी ही जाहिरात काढण्यात आली आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा?

या पदासाठी अर्ज करू इच्छिणारा उमेदवार हा 58 वर्ष वयापेक्षा अधिकचा नसावा. शैक्षणिक अहर्तेबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी मात्र उमेदवाराने एकदा अधिसूचना वाचायची आहे.

निवड कशी होणार?

या पदभरती अंतर्गत उमेदवाराची निवड ही थेट मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. अर्थातच या पदांसाठी कोणतीही लेखी परीक्षा उमेदवारांची घेतली जाणार नाही. 

हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! आता डीएपी मात्र 600 रुपयात मिळणार, केंद्र सरकारने लॉन्च केले नवीन डीएपी, पहा…

अर्ज कसा करावा लागणार?

उमेदवारांना अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने करायचा आहे. म्हणजे ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर सदर अर्जाची प्रत ही विद्यापीठात जमा करायची आहे. https://mu.ac.in/advertisement-of-variousposts या लिंक वर जाऊन इच्छुक आणि पात्र उमेदवार आपला अर्ज ऑनलाइन सादर करू शकतात आणि त्यानंतर अर्जाची प्रत विद्यापीठात जाऊन सबमिट करू शकतात.

अर्ज करण्याची शेवटची दिनांक

ऑनलाइन अर्ज 11 मे 2023 पर्यंत करता येणार आहेत. तसेच ऑफलाईन अर्जाची प्रत दिनांक 18 मे 2023 पर्यंत सादर करता येणार आहे.

जाहिरात कुठं पाहणार?

या भरती बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी मुंबई विद्यापीठ भरती 2023 या लिंक वर क्लिक करून आपण जाहिरात पाहू शकता.

हे पण वाचा :- मुंबईमध्ये नोकरीची सुवर्णसंधी ! ‘या’ विभागात निघाली विविध पदासाठी भरती, 65 हजारापर्यंतचा पगार मिळणार, वाचा सविस्तर