दहावी, बारावी उत्तीर्ण तरुणांसाठी खुशखबर! विमानतळावर काम करण्याची सुवर्णसंधी; भारतीय विमान सेवांमध्ये ‘या’ पदाच्या 8406 रिक्त जागेसाठी भरती सुरू, पहा….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Government Job Maharashtra : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्याची राजधानी मुंबई आणि सांस्कृतिक राजधानी पुणे या ठिकाणी नोकरीची सुवर्णसंधी चालून आली आहे. भारतीय विमान सेवा या विभागात 8406 जागांसाठी मेगा भरती आयोजित करण्यात आली आहे.

या भरतीच्या माध्यमातून 400 गार्ड आणि लिपिक पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार असून उर्वरित जागांसाठी लवकरच नोटिफिकेशन जाहीर केले जाणार आहे. या अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना मात्र भारतातील कोणत्याही विमानतळावर नोकरी करावी लागणार आहे. दरम्यान आज आपण या पदभरती संदर्भात काही आवश्यक महत्वाची माहिती थोडक्यात जाणून घेणार आहोत.

हे पण वाचा :- बातमी कामाची ! ‘शेतकरी असल्याच्या दाखल्या’बाबत झाला मोठा निर्णय; वाचा सविस्तर….

किती जागांसाठी आहे भरती?

खरं पाहता एकूण 8406 रिक्त जागा भारतीय विमानसेवा विभागात लवकरच भरली जाणार आहेत. यामध्ये सध्या 400 लिपिक आणि गार्ड पदाचा रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

आवश्यक शैक्षणिक पात्रता?

गार्ड पदासाठी उमेदवार किमान दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तसेच इतर शारीरिक मापदंड देखील संबंधित उमेदवारांचे मोजले जाणार आहेत. तसेच लिपिक या पदासाठी उमेदवार बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि टायपिंग कोर्स केलेला असणे गरजेचे राहणार आहे. टायपिंग प्रमाणपत्र देखील संबंधित उमेदवाराला लागणार आहे.

हे पण वाचा :- शेतकऱ्यांनो सावधान ! ‘या’ तारखेला पुन्हा अवकाळी पाऊस बरसणार; पंजाबरावांचा अंदाज

आवश्यक वयोमर्यादा

किमान 18 वर्षे ते कमाल 27 वर्ष या वयोगटातील उमेदवार संबंधित पदासाठी पात्र राहणार आहेत.

किती लागणार शुल्क?

या पदभरतीसाठी 750 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. मात्र जर उमेदवार मागासवर्गीय प्रवर्गातून असेल अर्थातच अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती प्रवर्गातील असेल तर सदर उमेदवाराकडून या ठिकाणी कोणतेच शुल्क आकारले जाणार नाही.

अर्ज कसा करायचा

या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार http://aaiclas.aero/careeruser/login या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपला अर्ज सादर करू शकणार आहेत. तसेच ज्यांना या भरतीची अधिसूचना पाहायची असेल त्यांनी http://aaiclas.aero/careeruser/login या लिंक वर जाऊन अधिसूचना बघायची आहे. 

हे पण वाचा :- शेतकऱ्यांनो काळजी घ्या ! ‘हे’ दोन दिवस राज्यात मुसळधार पाऊस पडणार, हवामान विभागाचा गंभीर इशारा