महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! हरभऱ्याचे नवीन वाण विकसित ; पिकाची यंत्राने करता येणार कापणी, घाटेअळी आणि मररोगास प्रतिकारक

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gram New Variety : शेतीमध्ये काळाच्या ओघात मोठा बदल पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे आता आधुनिक यंत्रांचा वापर शेतीमध्ये वाढला आहे. खरं पाहता मजूरटंचाईचा सामना करावा लागत असल्याने शेतकऱ्यांनी आता यंत्रांचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू केला आहे. मात्र असे असले तरी आता यंत्रांचा वापर करायचा म्हटलं म्हणजे पिकांच्या जाती देखील तेवढ्या सक्षम पाहिजे.

म्हणजे जर शेतकरी बांधवांना पिकांची कापणी यंत्राने करायची असेल तर ती जात यंत्राने कापणी करण्यासाठी मजबूत, सक्षम असणे अनिवार्य आहे. अशातच आता हरभऱ्याची नवीन जात शास्त्रज्ञांनी विकसित केली आहे. या नवीन जातीची सर्वात मोठी विशेषता म्हणजे या जातीचा हरभरा हा यंत्राने कापता येणे शक्य होणार आहे.

डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांनी ही हरभऱ्याची नवीन जात विकसित केली आहे. या जातीला कृषी विद्यापीठाने पीडीकेव्ही कनक असं नाव दिले आहे. विशेष म्हणजे यावर्षी शेतकऱ्यांना ही जात उपलब्ध होणार आहे.

आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की हरभरा हे रब्बी हंगामातील एक मुख्य पीक आहे. गव्हानंतर सर्वाधिक या पिकाची पेरणी केली जाते. या पिकाचे लागवडीखालील क्षेत्र हे 20 लाख हेक्टर एवढे आहे. साहजिकच हरभरा कापणी करण्यासाठी मजूर टंचाई जाणवणारच आहे. तसेच शेतीची इतरही कामे त्यावेळी प्रगतीपथावर असल्याने हरभरा काढणी करण्यासाठी शेतकऱ्यांना नाकी नऊ येऊन जातात.

शेतकऱ्यांची हीच अडचण लक्षात घेऊन डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने हरभऱ्याचे पी डी के व्ही कनक हे नवीन वाण विकसित केले आहे. हे वाण केवळ महाराष्ट्रासाठी प्रसारित झाल आहे असं नाही तर मध्य प्रदेश आणि गुजरात या राज्यांमध्ये देखील हे वाण पेरणीसाठी प्रसारित करण्यात आले आहे.

हे वाण यंत्राच्या साह्याने कापणी करता येणार आहे. हरभऱ्याची ही नवीन जात पेरणी केल्यानंतर 106 ते 111 दिवसात तयार होते. ओलिताखाली या जातीपासून 25 ते 28 क्विंटल हेक्टरी उत्पादन मिळतं तर कोरडवाहू मध्ये हे उत्पादन 11 ते 12 क्विंटल आहे. विशेष म्हणजे कोरडवाहू भागात एकदा पाणी भरलं तरी देखील या जातीपासून एवढे उत्पादन घेता येणे शक्य होणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

तसेच या जातीची सर्वात मोठी विशेषता म्हणजे घाटे अळी आणि मर रोगास प्रतिकारक असल्याचा दावा शास्त्रज्ञांच्या माध्यमातून करण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये या जातीची लोकप्रियता झपाट्याने वाढली असून महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ या जातीचे बियाणं शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणार आहे.

दरम्यान या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे सध्या लेबर लावून हरभरा काढणी करण्यासाठी हेक्टरी चार ते पाच हजाराचा खर्च येतो. शिवाय मळणी करण्याचा खर्च वेगळा राहतो. अशा परिस्थितीत जर शेतकऱ्यांनी यंत्राच्या साह्याने हरभराची काढणी केली तर त्यांना जवळपास तीन हजाराची बचत होणार आहे. निश्चितच हा नवीन जातीचा हरभरा कनक शेतकऱ्यांसाठी अतिशय फायद्याचा ठरणार आहे.