ग्रॅच्युइटी म्हणजे काय? कसे होते कॅल्क्युलेशन, किती रक्कम मिळते? जाणून घ्या सविस्तर माहिती

Published on -

Gratuity Calculator : जर तुम्ही एखाद्या सरकारी किंवा खाजगी संस्थेत नोकरी करत असाल आणि तुमचे पीएफ खाते असेल, तर निवृत्तीनंतर किंवा नोकरी सोडताना तुम्हाला अनेक आर्थिक फायदे मिळतात. पीएफ आणि ईपीएस पेन्शनसोबतच कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाचा लाभ म्हणजे ग्रॅच्युइटी.

अनेक कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटीबाबत संपूर्ण माहिती नसते. त्यामुळे आज आपण ग्रॅच्युइटी म्हणजे काय, ती कशी मोजली जाते आणि नेमकी किती रक्कम मिळू शकते, हे सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.

ग्रॅच्युइटी म्हणजे सलग किमान पाच वर्षे सेवा पूर्ण केल्यानंतर नोकरी सोडताना, निवृत्तीवेळी किंवा काही विशेष परिस्थितीत कंपनीकडून दिली जाणारी एकरकमी रक्कम होय. हा लाभ पेमेंट ऑफ ग्रॅच्युइटी कायदा, 1972 अंतर्गत दिला जातो.

कर्मचारी निवृत्त झाला, राजीनामा दिला किंवा त्याचा मृत्यू झाला तरीही त्याच्या कुटुंबाला ग्रॅच्युइटी मिळू शकते. अपघात किंवा गंभीर आजारामुळे अपंगत्व आल्यास पाच वर्षांची अट लागू होत नाही.

ग्रॅच्युइटीची रक्कम कर्मचाऱ्याच्या शेवटच्या पगारावर (मूळ वेतन + डीए) आणि एकूण सेवा कालावधीवर अवलंबून असते. यासाठी एक ठराविक सूत्र वापरले जाते.

ग्रॅच्युइटीचे सूत्र : (मासिक पगार × 15 × सेवा वर्षे) ÷ 26

येथे 15 म्हणजे 15 दिवसांचा पगार आणि 26 म्हणजे महिन्यातील कामकाजाचे दिवस.

महत्त्वाची बाब म्हणजे, एखाद्या वर्षात 6 महिन्यांपेक्षा जास्त सेवा केली असेल तर ते पूर्ण एक वर्ष धरले जाते. उदाहरणार्थ, 5 वर्षे 6 महिने सेवा केली असेल, तर ती 6 वर्षे मानली जाते.

जर एखाद्या कर्मचाऱ्याचा शेवटचा पगार 30,000 रुपये असेल, तर 5 वर्षांच्या सेवेनंतर त्याला सुमारे 86,538 रुपये ग्रॅच्युइटी मिळते. 7 वर्षांच्या सेवेसाठी ही रक्कम सुमारे 1,21,154 रुपये होते, तर 10 वर्षांच्या सेवेसाठी सुमारे 1,73,077 रुपये मिळू शकतात. 15 वर्षांच्या सेवेनंतर ही ग्रॅच्युइटी सुमारे 2,59,615 रुपयांपर्यंत जाते.

सध्या ग्रॅच्युइटीची कमाल मर्यादा 20 लाख रुपये इतकी आहे. यापेक्षा जास्त रक्कम दिली गेल्यास ती ‘एक्स-ग्रेशिया’ म्हणून गणली जाते. त्यामुळे प्रत्येक कर्मचाऱ्याने आपल्या सेवेचा कालावधी आणि शेवटचा पगार लक्षात घेऊन ग्रॅच्युइटीचा अंदाज आधीच बांधणे फायदेशीर ठरते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News