शेतकऱ्यांनो काळजी घ्या ! ‘हे’ दोन दिवस राज्यात मुसळधार पाऊस पडणार, हवामान विभागाचा गंभीर इशारा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Imd Rain Alert : राज्यात गेल्या दोन दिवसांपासून विदर्भ वगळता सर्वत्र हवामान कोरडे पाहायला मिळत आहे. गर्भातील काही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला तर बहुतांशी जिल्ह्यात विदर्भात ढगाळ हवामान कायम राहिले. आज पासून मात्र विदर्भात देखील हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. म्हणजे जवळपास संपूर्ण राज्यात आता पावसाने उघडीत दिली आहे.

यामुळे शेतकऱ्यांच्या शेती कामाला पुन्हा एकदा वेग मिळणार आहे. मात्र अशातच पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे रब्बी हंगामाच्या कामात व्यस्त असलेल्या शेतकऱ्यांच्या चिंतेत पुन्हा एकदा भर पडणार आहे. उत्तर भारतात पुन्हा वाऱ्याची चक्रीय परिस्थिती तयार होत असल्याने ही परिस्थिती तयार होणार आहे.

हे पण वाचा :- मोठी बातमी! ‘त्या’ एसटी कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई; महामंडळाचे पत्र निर्गमित

त्यामुळे हिमालयात बर्फवृष्टी होत असून देशातील कमाल तापमानात घट झाली आहे. दरम्यान या परिस्थितीमुळे पाच आणि सहा एप्रिल रोजी महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यात या कालावधीमध्ये पाऊस पडेल असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला असून पावसाची शक्यता लक्षात घेता या संबंधित विभागातील शेतकऱ्याना आता सजग राहण्याची गरज राहणार आहे. पाच आणि सहा एप्रिलला पाऊस पडणार असल्याने शेतकरी बांधवांनी 5 एप्रिल पूर्वी आपली शेतीची कामे करून घ्या. एवढ्या दोन दिवसात शेतीची कामे करून घेणे गरजेचे आहे.

हे पण वाचा :- 10वी पास तरुणांसाठी एसटी महामंडळात नोकरीची संधी! या पदाच्या रिक्त जागेवर भरती सुरु; आजच करा इथं अर्ज

या भागात पडणार पाऊस

हिमालयात पश्चिमे चक्रवात पुन्हा एकदा सक्रिय झाल्याने महाराष्ट्रात पावसाची शक्यता असल्याचा अंदाज तज्ञ लोकांनी बांधला आहे. राज्यातील कोकण वगळता जवळपास सर्व विभागात पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात पाऊस पडणार आहे.

पाच एप्रिल रोजी अर्थातच परवा मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे. 6 एप्रिलला मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता राहणार आहे. यादरम्यान पडणारा पाऊस हा हलक्या स्वरूपाचा असेल यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून न जाता शेती कामांचे योग्य नियोजन करणे गरजेचे राहणार आहे. 

हे पण वाचा :- मुंबई-गोवा महामार्गाबाबत मोठी अपडेट ! मे महिन्यात सुरु होणार ‘हा’ महत्वाचा बोगदा; एका तासाचा प्रवास आता केवळ 10 मिनिटात, पहा…..