अरे बापरे! भारतीय हवामान विभागाचा गंभीर इशारा; उद्यापासून ‘या’ जिल्ह्यात पडणार मुसळधार पाऊस !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Imd Rain Alert : गेल्या काही दिवसांपासून राज्यात तापमानात सातत्याने बदल होत आहे. त्यामुळे हवामानावर विपरीत परिणाम होत असून काही ठिकाणी अवकाळी पाऊस तर काही ठिकाणी गारपीट होत आहे. यामुळे मात्र बळीराजाचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. गेल्या महिन्यात झालेल्या गारपिटीमुळे तसेच अवकाळी पावसामुळे राज्यातील रब्बी हंगामातील गहू, हरभरा, कांदा यांसारख्या सर्वच पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

या नुकसानीतून थोड्याफार प्रमाणात वाचलेली पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांनी पुन्हा शर्तीने प्रयत्न सुरू केले होते मात्र अशातच या चालू महिन्यात म्हणजेच एप्रिल महिन्यात पुन्हा एकदा अवकाळी पाऊस आणि गारपीट सुरू झाली. यामुळे मात्र शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. गेल्या पंधरा ते सोळा दिवसांपासून राज्यात भाग बदलत रोजच पावसाची हजेरी लागत आहे.

हे पण वाचा :- शेतकऱ्यांनो काळजी घ्या; ‘या’ भागात आजपासून तुफान गारपीट होणार ! पंजाबराव डख यांचा नवा अंदाज

यामुळे शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आला असल्याचे चित्र आहे. दरम्यान भारतीय हवामान विभागाने 24 एप्रिल 2023 रोजी अर्थातच सोमवारपासून पुन्हा एकदा महाराष्ट्रात पावसाची शक्यता असल्याचा अंदाज नुकताच व्यक्त केला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 24 ते 26 एप्रिल दरम्यान राज्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे.

मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता राहणार असल्याचे मत IMD च्या माध्यमातून व्यक्त करण्यात आले आहे. म्हणजेच कोकण वगळता जवळपास संपूर्ण राज्यात पावसाची शक्यता असल्याचे सांगितले गेले आहे. निश्चितच जर हा हवामान विभागाचा अंदाज खरा ठरला तर शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढण्याची दाट शक्यता आहे. आधीच खरीप हंगामात शेतकऱ्यांना अपेक्षित असे उत्पन्न मिळालेले नाही.

हे पण वाचा :- महाराष्ट्रातील प्रसिद्ध भेंडवळच्या घट मांडणीचे भाकीत जाहीर; यंदा ‘असा’ राहणार पावसाळा, ‘या’ महिन्यात पडणार खूपच कमी पाऊस? वाचा सविस्तर

आता रब्बी हंगामात देखील शेतकऱ्यांना या अकाळी पडणाऱ्या पावसामुळे मोठा फटका बसत आहे. विशेष म्हणजे सध्या पडत असलेला अवकाळी पाऊस पाहता खरीप हंगामात म्हणजे मान्सून काळात चांगला पाऊस पडणार नाही अशी भीती आता शेतकऱ्यांना वाटू लागली आहे. परंतु भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून यंदा मान्सून समाधानकारक राहील असं नुकतच सांगितलं गेल आहे.

तसेच ज्येष्ठ हवामानातज्ञ पंजाबराव डख यांनी देखील यावर्षी चांगला मानसून राहणार असल्याचे मत नुकतेच वर्तवले आहे. यामुळे मान्सूनबाबत शेतकऱ्यांनी चिंता करण्याची फारशी गरज नसल्याचे चित्र तयार होत आहे. तसेच पुढील काही दिवस राज्यात पावसाची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी या कालावधीमध्ये आपल्या काढणी केलेल्या मालाची आणि शेती पिकाची अधिक काळजी घेणे अपेक्षित आहे.

हे पण वाचा :- पुणे-औरंगाबाद ग्रीनफील्ड महामार्ग; ‘या’ 4 जिल्ह्यातील 122 गावांमध्ये होणार भूसंपादन; जमिनीला मिळणार सोन्याचा भाव, पहा कुठवर आलं काम?