IPL 2021: CSK ला 20 कोटी व KKR ला हरल्यानंतर हे बक्षीस मिळाले ! जाणून घ्या सविस्तर….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 16 ऑक्टोबर 2021 :- चेन्नई सुपर किंग्ज (CSK) ने IPL 2021 च्या अंतिम फेरीत कोलकाता नाईट रायडर्स (KKR) ला हरवून IPL ट्रॉफी जिंकली. त्याने आयपीएलचे चौथे जेतेपद पटकावले. यापूर्वी चेन्नईचा संघ २०१०, २०११ आणि २०१८ मध्ये चॅम्पियन बनला होता.

आयपीएलच्या १४ व्या हंगामाच्या अंतिम सामन्यानंतर बक्षिसांचा वर्षाव झाला. चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्जला २०  कोटी रुपयांची बक्षीस रक्कम मिळाली. अंतिम फेरीत पराभूत झालेली केकेआरची टीम १२.५ कोटी रुपयांच्या बक्षिसांस पात्र ठरली.

आयपीएल २०२१ मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या CSK चा डॅशिंग सलामीवीर ऋतुराज गायकवाड (६३५ धावा) ने ऑरेंज कप जिंकला. त्याला १० लाखांचा धनादेश मिळाला. याशिवाय, त्याला उदयोन्मुख खेळाडू पुरस्कार (१०,००,००० रुपये) देखील मिळाला.

आयपीएल २०२१ मध्ये अवघ्या दोन धावांच्या फरकाने ऑरेंज कॅप जिंकणारा ऋतुराज म्हणाला की, संघ चॅम्पियन झाल्यामुळे त्याच्या कर्तृत्वाचे महत्त्व वाढले आहे.

गायकवाडने स्पर्धेत ६३५ धावा केल्या, तर सहकारी सलामीवीर फाफ डु प्लेसिस ६३३ धावांसह दुसऱ्या स्थानावर राहिला. अंतिम फेरीत चेन्नईने कोलकाता नाईट रायडर्सचा २७ धावांनी पराभव केला.

बक्षीस रक्कम

१. चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्जला २० कोटींचा धनादेश मिळाला.

२. उपविजेता कोलकाता नाईट रायडर्सला १२.५ कोटींचा धनादेश मिळाला.

कोण कोण होते आयपीएल चॅम्पियन्स ?

१. मुंबई इंडियन्स – कर्णधार रोहित शर्मा ५ वेळा (२०१३, २०१५, २०१७, २०१९ आणि २०२०)

२. चेन्नई सुपर किंग्ज – कर्णधार महेंद्रसिंग धोनी ४ वेळा (२०१०, २०११, २०१८ आणि २०२१)

३. कोलकाता नाईट रायडर्स – कर्णधार गौतम गंभीर २ वेळा (२०१२ आणि २०१४)

४. सनरायझर्स हैदराबाद – १ वेळ (२०१६) कर्णधार डेव्हिड वॉर्नर

५. डेक्कन चार्जर्स – १ वेळ (२००९) कॅप्टन अॅडम गिलख्रिस्ट

६. राजस्थान रॉयल्स – १ वेळ (२००८) कर्णधार शेन वॉर्न