शेतकऱ्यांनो इकडे लक्ष द्या! ‘ही’ कागदपत्रे तयार असतील तरच मिळणार कांदा अनुदानाचे पैसे, पहा….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Kanda Anudan 2023 Document List : गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात कांद्याला अतिशय कवडीमोल दर मिळत आहे. यामुळे राज्यातील कांदा उत्पादकांची कोंडी झाली आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांद्याला मिळत असलेल्या कवडीमोल दरामुळे लाखों रुपयांचा फटका बसला आहे.

अशा परिस्थितीत कांदा उत्पादकांना अनुदान देण्याची मागणी विरोधी पक्षांकडून तसेच शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शासनाकडे केली जात होती. विशेष बाब अशी की सत्ता पक्षातील काही लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून देखील कांद्याला अनुदान देण्याची मागणी जोर धरत होती. 

हे पण वाचा :- पंजाबराव डख यांची मोठी माहिती; मे महिन्यातही अवकाळी पाऊस; जून महिन्याच्या ‘या’ तारखेला मान्सून करणार एन्ट्री ! ‘असा’ राहणार यंदाचा पावसाळा……

या पार्श्वभूमीवर शिंदे फडणवीस सरकारने एक मोठा निर्णय घेतला आणि राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना तीनशे रुपये प्रतिक्विंटल अनुदान देण्याचा निर्णय सुरूवातीला झाला. मात्र या निर्णयाचा विरोधी पक्षांसहित शेतकरी संघटनांच्या माध्यमातून विरोध करण्यात आला आणि अनुदान वाढवण्याची मागणी झाली.

मग शिंदे सरकारने यावर सावरासावर करत 350 रुपये प्रति क्विंटल अनुदान देण्याचा निर्णय घेतला. यासाठीचा शासन निर्णय निर्गमित झाला असून आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 200 क्विंटल च्या मर्यादित 350 रुपये प्रति क्विंटल इतकं अनुदान दिले जाणार आहे. दरम्यान तीन एप्रिल 2023 पासून कांदा अनुदान मिळवण्यासाठी अर्ज सादर करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. 

हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी खुशखबर; ‘या’ कारणामुळे तुरीचे दर जाणार 9 हजार पार !

शेतकऱ्यांना विहित नमुन्यामध्ये त्यांनी ज्या बाजार समितीमध्ये कांदा विक्री केला आहे त्या बाजार समितीमध्ये अर्ज सादर करण्याचे आवाहन केले जात आहे. अर्ज प्रक्रिया 20 एप्रिल 2023 पर्यंत सुरू राहणार आहे. 

कोल्हापूर बाजार समितीमध्ये सादर झालेत इतके अर्ज

राज्य शासनाच्या माध्यमातून लेट खरीप हंगामातील कांद्याला अनुदान देण्याची घोषणा झाली आहे. महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समिती, खाजगी बाजार समिती आणि नाफेडकडे कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना हे अनुदान मिळणार आहे. यासाठी तीन एप्रिल ते 20 एप्रिल दरम्यान अर्ज शेतकऱ्यांना पाठवावा लागणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार आत्तापर्यंत कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 350 शेतकऱ्यांनी आपले अर्ज पाठवले आहेत.

वास्तविक कोल्हापूर एपीएमसी ही कांद्याच्या बाजारासाठी विशेष ओळखली जाते. या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यातील तसेच पुणे, नाशिक आणि सातारा जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात कांदा विक्रीसाठी येत असतात. आता या एपीएमसी मध्ये कांदा विक्री केलेले शेतकरी अनुदानासाठी आपला अर्ज सादर करत आहेत. आतापर्यंत 350 शेतकऱ्यांनी आपले अर्ज एपीएमसी मध्ये सादर केले असून पात्र शेतकऱ्यांना लवकरात लवकर आपला अर्ज सादर करण्याचे आवाहन एपीएमसीच्या माध्यमातून केले जात आहे.

हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! वैयक्तिक शेततळे योजनेसाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांची लॉटरी निघाली; तुमचा नंबर लागला की नाही?, पहा…..

कोणती कागदपत्रे लागणार?

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान मिळवण्यासाठी विहित नमुन्यामध्ये अर्ज करावा लागणार आहे. हा विहित नमुना अर्ज शेतकऱ्यांना बाजार समितीमध्येच मिळून जाणार आहे. या अर्जासोबत शेतकऱ्यांना काही कागदपत्रे देखील द्यावी लागणार आहेत. यामध्ये कांदा विक्रीची मूळ पट्टी, कांदा पिकाची नोंद असलेला सात-बारा उतारा, बँक पासबुकच्या पहिल्या पानांची छायांकित प्रत, कांदा व विक्री पट्टी, मुलांच्या अथवा अन्य कुटुंबीयांच्या नावे कांदा विक्री झाली असल्यास अशा प्रकरणामध्ये सात-बारा ज्यांच्या नावावर आहे, त्यांचे शपथपत्र यांसारखी महत्त्वाची कागदपत्रे शेतकऱ्यांना अर्जासोबत सादर करावे लागणार आहेत. 

हे पण वाचा :- टाटा है तो सब मुमकिन है ! टाटाच्या ‘या’ शेअर्समध्ये गुंतवणूक करणारे लवकरच बनणार धनवान; कारण की….