Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

शेतकऱ्यांसाठी दिलासादायक! खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय, वाचा….

Kharif Season : मे महिन्याचा पहिला पंधरवडा उलटला आहे. अशा परिस्थितीत आता चाहूल लागली आहे ती मान्सूनची. मान्सून बाबत भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून नुकतीच एक मोठी माहिती देखील देण्यात आली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार यंदा मान्सून केरळमध्ये 4 जूनला दाखल होणार आहे. त्यानंतर सात जूनच्या सुमारास मान्सून महाराष्ट्रात येण्याची दाट शक्यता आहे. अर्थातच येत्या काही दिवसात आता मान्सूनला सुरुवात होणार आहे.

तत्पूर्वी शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी आवश्यक पूर्वतयारी सुरू केली आहे. दरम्यान खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या माध्यमातून देशभरातील शेतकऱ्यांसाठी एक मोठा दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे.

हे पण वाचा :- पदवीधर उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी ! सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयात ‘या’ पदासाठी निघाली भरती, आजच इथं करा अर्ज

हा निर्णय आहे खतांच्या संदर्भात. आगामी खरीप हंगामात शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र शासनाने यावर्षी खतांच्या किमतीत वाढ न करण्याचा निर्णय घेतला आहे. आज अर्थातच 17 मे 2023 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने 1.8 लाख कोटी रुपयांचा खत अनुदानाला मंजुरी दिली आहे.

युरियासाठी सरकार ७० हजार कोटी रुपये आणि डाय-अमोनियम फॉस्फेट (डीएपी) साठी ३८ हजार कोटी रुपये खर्च करणार आहे. अर्थातच यंदा देखील शेतकऱ्यांना अनुदानावर खते मिळणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांना अधिकचा पैसा पीक उत्पादनासाठी खर्च करावा लागणार नाही.

हे पण वाचा :- तरुणांसाठी आनंदाची बातमी ! इंडियन नेव्ही मध्ये तब्बल 372 रिक्त पदांसाठी निघाले भरती, अर्ज कुठं करणार? पहा…

आंतरराष्‍ट्रीय बाजारपेठेत खतांच्या किमतीत तफावत आहे पण देशातील शेतकऱ्यांना वेळेवर आणि त्यांना परवडेल या दरात खत उपलब्ध करून देण्यासाठी केंद्रशासन कटिबद्ध आहे. त्यानुसार, मंत्रिमंडळाने खत अनुदानासाठी आवश्यक निधीला आज मंजुरी दिली आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, गेल्या वर्षी अर्थसंकल्पात खत अनुदानासाठी २.५६ लाख कोटी रुपये खर्च केले होते. यंदा देखील खत अनुदानाला मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे खरीप हंगामात शेतकऱ्यांना वाढीव दरात खत खरेदी करावे लागणार नाही यामुळे त्यांच्या उत्पादन खर्चात बचत होईल आणि उत्पादनात वाढ होईल असे मत व्यक्त होत आहे.

हे पण वाचा :- तुम्ही घरात किती रोकड रक्कम ठेऊ शकतात? घरात अधिक कॅश ठेवल्यास काय होते ? आयकर विभागाचा नियम वाचाच !