Ladki Bahin-Pm Kisan Yojana : केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून समाजातील सर्वच घटकांसाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. गरीब आणि गरजवंत लोकांना सन्मानाने आयुष्य जगता यावे यासाठी शासन नेहमीच प्रयत्नशील राहिले आहे. यासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून अशाही काही योजना राबवल्या जात आहेत ज्यातून थेट नागरिकांच्या खात्यात पैसे जमा केले जात आहेत.
केंद्रशासनाकडून राबवली जाणारी पीएम किसान सन्मान निधी योजना, राज्य शासनाकडून राबवली जाणारी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना तसेच लाडकी बहीण योजना या अशाच काही लोकप्रिय योजना आहेत.
दरम्यान आता याच तिन्ही योजना संदर्भात एक मोठे अपडेट हाती आले आहे. या तिन्ही योजनेअंतर्गत दिला जाणारा लाभ हा डिसेंबर महिन्यात मिळण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 19 वा हप्ता, नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा 6वा हफ्ता अन लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता लवकरच पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. खरे तर सध्या महाराष्ट्रात सत्ता स्थापनेवरून गदारोळ सुरू आहे.
महायुतीला जनतेने स्पष्ट बहूमत दिले आहे मात्र अजून महायुतीचा मंत्रिमंडळाचा आणि मुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्युला ठरला नसल्याने नवीन सरकार अजून सत्तेवर येऊ शकलेले नाही.
मात्र येत्या दोन-तीन दिवसात राज्यात नवीन सरकार स्थापित होणार आहे. लवकरच नव्या सरकारचा शपथविधी सोहळा होईल अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
अशा या परिस्थितीतच लाडकी बहीण योजना, पीएम किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी हाती आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार डिसेंबर महिन्यात अर्थातच नवीन सरकार सत्तेवर आल्यानंतर या तिन्ही योजनेचे पैसे पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत.
पी एम किसान योजनेच्या 19व्या हफ्त्याचे 2 हजार, नमो शेतकरी योजनेच्या सहाव्या हफ्त्याचे 2 हजार अन लाडकी बहीण योजनेच्या सहाव्या हप्त्याचे 1500 रुपये असे एकूण पाच हजार पाचशे रुपये पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत.
महत्त्वाचे म्हणजे जर लाडकी बहीण योजनेच्या रकमेत सरकारने वाढ करण्याचा निर्णय घेतला तर ही रक्कम 6,100 रुपयापर्यंत जाऊ शकते. यामुळे आता नवीन सरकार नेमका काय निर्णय घेणार याकडे साऱ्यांचे लक्ष राहणार आहे.