Ladki Bahin Yojana : नुकत्याच काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष प्रणित महायुती सरकारला मोठा फटका बसला. राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिंदे फडणवीस पवार सरकार स्थापित झाल्यानंतर राज्यातील सर्वसामान्य जनतेसाठी शेकडो योजना सुरू झाल्यात.
मुख्यमंत्री शिंदे यांनी सर्वसामान्यांसाठी अनेक मोठमोठे निर्णय घेतलेत. यामुळे महायुती सरकारला लोकसभा निवडणुकीत चांगल्या जागा जिंकता येतील असा विश्वास होता. मात्र, लोकसभा निवडणुकीत महायुती सरकारला फटका बसला.
या पराभवानंतर विरोधकांकडून चुकीचा नॅरेटिव्ह सेट केल्यामुळे पराभव झाल्याचा आरोप सातत्याने सरकारकडून केला जातोय. दरम्यान आता विरोधकांच्या चुकीच्या नॅरेटिव्हला काउंटर करण्यासाठी महायुती सरकारने राज्यातील महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी काही मोठमोठे निर्णय घेतलेत. यातीलच एक मोठा निर्णय म्हणजे लाडकी बहीण योजना.
सध्या या योजनेची संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा सुरू आहे. या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये दिले जाणार आहेत. अर्थातच एका पात्र महिलेला एका वर्षात 18 हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे. राज्यातील 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिला याच्या लाभासाठी पात्र ठरणार आहेत.
आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर अशा पाच महिन्यांचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात वर्ग करण्यात आले आहेत. महत्त्वाची बाब अशी की राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता हा देखील या चालू नोव्हेंबर महिन्यातच पात्र महिलांच्या खात्यात जमा करू अशी ग्वाही दिली आहे.
आचारसंहिता संपल्यानंतर लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता म्हणजेच डिसेंबर महिन्याचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्याचा मानस सरकारने बोलून दाखवला आहे.
ज्याप्रमाणे नोव्हेंबर महिन्याचे पैसे महिलांना ऍडव्हान्स मध्ये देण्यात आले होते त्याच धरतेवर डिसेंबर महिन्याचे पैसे देखील महिलांच्या खात्यात ॲडव्हान्स मध्ये जमा होणार आहेत. या योजनेमुळे लोकसभा निवडणुकीत बॅक फुटवर असणारी महायुती सरकार आता फ्रंट फुटवर आले आहे. ही योजना विधानसभा निवडणुकीत मास्टर स्ट्रोक ठरणार आहे. या योजनेमुळे विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला फायदा होईल असा विश्वास राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केला जात आहे.
लाडकी बहीण योजनेचे पैसे दुप्पट होणार!
लाडकी बहीण योजनेचा राज्यातील दोन कोटी महिलांनी लाभ घेतलाय. महत्त्वाचे म्हणजे भविष्यात या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या रकमेत वाढ होणार अशी ग्वाही सरकारने दिली आहे.
या योजनेचे मानधन हे दीड हजारांवरून दोन हजार, अडीच हजार, तीन हजार करण्याचा मानसही महायुती सरकारने व्यक्त केला आहे. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे आश्वासन दिले आहे. महायुती सरकारने या योजनेचा पुढील हप्ता आचारसंहिता झाल्यानंतर लगेचच दिला जाईल असे म्हटले आहे.
नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी या योजनेचा पुढील हप्ता दिला जाणार अशी माहिती सरकारने दिली आहे. या योजनेसाठी तब्बल 46000 कोटी रुपयांची तरतूद करून देण्यात आली आहे.
अर्थातच पुढील पाच वर्षांसाठी आवश्यक असणाऱ्या पैशांची तरतूद सरकारने आधीच करून ठेवलेली आहे. यामुळे पुढील पाच वर्ष तरी ही योजना बंद पडणार नाही. दरम्यान महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी ही योजना कायमस्वरूपी सुरू राहणार अशी ग्वाही दिलेली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील ही योजना कायमस्वरूपी सुरू राहणार असे सांगितले आहे. दरम्यान आता या लाडकी बहीण योजनेचा आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला कितपत फायदा होतो?
या योजनेमुळे राज्यात पुन्हा महायुती सरकार सत्ता काबीज करणार का ? हे पाहणे विशेष उत्सुकतेचे ठरणार आहे. तथापि या योजनेमुळे महायुती सरकारला निवडणुकीत फायदा होऊ शकतो असा दावा विश्लेषकांकडून केला जातोय.