2025 मध्ये गॅस सिलेंडरच्या किमती कमी होणार? ‘या’ कारणामुळे चर्चांना उधाण

गेल्या काही दिवसांपासून घरगुती या सिलेंडरच्या किमती स्थिर आहेत मात्र व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमती वाढत आहेत. आता पुढील महिन्याच्या एक तारखेला सरकारी तेल कंपन्या सध्याच्या गॅसच्या दरांचे पुनरावलोकन करतील आणि नवीन किंमती जाहीर करणार आहेत. खरे तर गेल्या काही वर्षांपासून भारतात एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती विक्रमी पातळीवर पोहोचल्या आहेत.

Tejas B Shelar
Published:
LPG Gas Cylinder Price

LPG Gas Cylinder Price : येत्या काही दिवसांनी नवीन वर्षाला सुरुवात होणार असून नवीन वर्षाच्या सुरुवातीला देशात अनेक बदल पाहायला मिळणार आहेत. पेट्रोल डिझेलच्या किमती समवेतच एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत देखील नवीन वर्षाच्या सुरुवातीला बदल होण्याची शक्यता आहे.

खरे तर प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत बदल होत असतो. एक जानेवारी 2025 ला देखील हा बदल होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून घरगुती या सिलेंडरच्या किमती स्थिर आहेत मात्र व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमती वाढत आहेत.

आता पुढील महिन्याच्या एक तारखेला सरकारी तेल कंपन्या सध्याच्या गॅसच्या दरांचे पुनरावलोकन करतील आणि नवीन किंमती जाहीर करणार आहेत. खरे तर गेल्या काही वर्षांपासून भारतात एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती विक्रमी पातळीवर पोहोचल्या आहेत.

मात्र भारताच्या मित्र देशांमध्ये एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती कमी झाले आहेत. रशियामध्ये गॅसच्या किमती फारच कमी झाल्या आहेत. रशियामध्ये एलपीजी गॅस ची किंमत निम्म्याने कमी झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रशियामध्ये डिसेंबर २०२४ मध्ये एलपीजी गॅसच्या किंमत ५० टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. नोव्हेंबरच्या शेवटी एलपीजी गॅसची किंमत 28000 Roubles होती. परंतु या किंमती कमी होऊन डिसेंबरमध्ये 14000 Roubles म्हणजेच १४० डॉलर झाली आहे.

म्हणून आता याचा परिणाम आपल्या भारतावरही पाहायला मिळणार का असा प्रश्न उपस्थित होतोय. भारतातही एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती कमी होणार का? याकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे. खरंतर रशिया युरोपियन कंट्रीज मध्ये मोठ्या प्रमाणात एलपीजी गॅस एक्सपोर्ट करत असे.

मात्र रशिया आणि युक्रेन मध्ये सुरू असणाऱ्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर युरोपियन देशांनी रशियाकडून एलपीजी गॅस खरेदी करणे थांबवलेले आहे. याचा परिणाम म्हणून रशियामध्ये एलपीजी गॅसच्या किमती कमी झाल्या आहेत.

यामुळे आता रशियाकडून चीन, मंगोलिया, अर्मिनिया, जॉर्जिया या देशांमध्ये एलपीजी गॅस अधिक प्रमाणात एक्सपोर्ट केला जात आहे. भारत रशियाकडून कच्चे तेल मोठ्या प्रमाणात आयात करतो मात्र एलपीजी गॅस आयात करत नाही. अशा परिस्थितीत आता भारत रशियाकडून एलपीजी गॅस आयात करणार का? असा प्रश्न उभा झाला आहे.

तसेच रशियामध्ये एलपीजी च्या किमती कमी झाल्या असल्याने भारतातही एलपीजी च्या किमती कमी होऊ शकतात का? अशा काही चर्चा सध्या सुरू आहेत. मात्र नवीन वर्षाच्या सुरुवातीलाचं एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती कमी होतील की वाढतील हे क्लियर होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe