ये हुई ना बात ! 8 लेन, 3 इंटरचेंज, 4 सी लिंक, 2 बोगदे असलेला महामार्ग महाराष्ट्रात ; 22 किलोमीटरसाठी 25,000 कोटींचा होणार खर्च, पहा डिटेल्स

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Breaking : भारतात सध्या रस्ते विकासाच्या योजना मोठ्या प्रमाणात राबवल्या जात आहेत. खरं पाहता दिवसेंदिवस देशाची लोकसंख्या वाढत असून यामुळे वाहतूक कोंडी देखील मोठ्या प्रमाणात शहरांमध्ये पाहायला मिळत आहे. शहरात वाढणारे उद्योगधंदे यामुळे शहरातील जागा कमी होत चालली आहे. दरम्यान वाहतूक कोंडीचा नागरिकांना मोठा फटका बसत आहे.

अशातच रस्ते विकासाच्या कामासाठी शासनाला चांगलेच तारेवरची कसरत करावी लागत आहे. मात्र आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आता कमी जागेत रस्त्यांची उभारणी केली जात आहे. यामध्ये डबल डेकरसारखे पूल उभारून कमी जागेत रस्ते नियोजन होत आहे. एवढेच नाही तर महाराष्ट्रात असे काही प्रयोग सुरू आहेत ज्याने सर्वांचेच लक्ष आपल्याकडे वेधले आहे.

आपल्या राज्यात सागरी पूल, निओ मेट्रो, भुयारी मार्ग उभारले जात आहेत. अशातच मुंबईमधील कोस्टल प्रोजेक्ट देखील स्थापत्य अभियांत्रिकीचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून सध्या चर्चेचा विषय बनला आहे. खरं पाहता मुंबईत रस्ते उभारण्यासाठी जागेचा अभाव लक्षात घेता मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर गेल्या काही वर्षांपूर्वी रस्ते उभारणीसाठी विचार सुरू झाला. आता हा विचार सत्यात उतरला आहे. तज्ञांनी समुद्रकिनाऱ्यावर रस्ते उभारणीसाठी ग्रीन सिग्नल दिल्यानंतर कोस्टल रोड प्रकल्प उभारला जात आहे.

या प्रोजेक्ट अंतर्गत मुंबईचा मरीन ड्राइव्ह ते उत्तर मुंबईतील कांदिवली हा समुद्रमार्ग जोडण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या कोस्टल रोड प्रकल्पाचे सर्वात मोठी खासियत म्हणजे या प्रकल्पाला बांद्रा वरळी सी लिंक रोड जोडला जातो. हा सी लिंक या प्रकल्पाच्या मध्यात येतो. या कोस्टल रोड प्रकल्पाचे हे एकूण 29.2 किलोमीटर आहे. यामध्ये बांद्रा वरळी सी लिंकच्या 5.6 किलोमीटर अंतराचा देखील समावेश आहे.

दरम्यान आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की हा प्रोजेक्ट एकूण दोन टप्प्यात पूर्ण केला जाणार आहे. मरीन ड्राईव्ह मुंबई पासून ते वरळी सी लिंक पर्यंत असा या प्रोजेक्टचा पहिला टप्पा आहे. हा पहिला टप्पा एकूण 10.58 किलोमीटर लांबीचा आहे. तसेच दुसरा टप्पा हा वरळी सी लिंक ते कांदिवली यादरम्यान राहणार आहे. याचं अंतर हे 12.04 किलोमीटर आहे.

आम्ही आपणांस सांगू इच्छितो की, या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचा खर्च हा साडेबारा हजार कोटीहून अधिक आहे. या पहिल्या टप्प्याच्या बांधकामाला 2018 मध्ये सुरुवात झाली असून आत्तापर्यंत 75 टक्के काम झाले आहे. दरम्यान जाणकार लोकांनी या प्रोजेक्टचे काम या चालू वर्षातील नोव्हेंबर पर्यंत पूर्ण होईल असा आशावाद व्यक्त केला आहे.

कोस्टल रोडची विशेषता तर जाणून घ्या 

या प्रोजेक्टची सर्वात मोठी विशेषता म्हणजे यामधील बोगदे. या प्रोजेक्टांतर्गत दोन किलोमीटर लांबीचे दोन समांतर बोगदे उभारले जात आहेत. जे की मरीन ड्राईव्हच्या प्रिन्सेस स्ट्रीट ते प्रियदर्शनी पार्कपर्यत समुद्रकिनाऱ्याखाली तयार केले जात आहेत. भारतात अशा प्रकारचा हा पहिलाचं बोगदा असल्याची माहिती देण्यात आली आहे. या बोगद्याचा व्यास हा 11 मीटर आहे. तसेच हा बोगदा समुद्र किनाऱ्यापासून जवळचं बांधला गेला असल्याने आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.

बोगद्याव्यतिरिक्त या कोस्टल रोडवरील चार अंडरग्राउंड पार्किंग देखील विशेष चर्चेत आहेत. तसेच या रोडवर 3 इंटरचेंजही आहेत.

हा कोस्टल रोड 8 लेनचा म्हणजे आठपदरी फ्री – एक्सप्रेस वे राहणार आहे.

या रोडवर मोनोपाइल तंत्राचा वापर करून एकूण 176 खांब बांधले जात आहेत.

हाती आलेल्या माहितीनुसार या प्रकल्पाचा पहिला टप्पा हा चालू वर्षातील नोव्हेंबर महिन्यात कम्प्लीट होणार आहे. दरम्यान यानंतर शहरासाठी फुलपाखरू उद्यान, डायव्हर्सिटी पार्क तसेच 8.50 किलोमीटर लांब आणि 20 मीटर रुंद समुद्री रिसॉर्ट्स करण्यात येणार असल्याची माहिती एका मीडिया रिपोर्ट मध्ये देण्यात आली आहे.

याशिवाय या प्रकल्पांतर्गत सायकल ट्रॅक, ओपन एअर थिएटर, पर्यटकांना बसण्यासाठी जागा यासह 1800 वाहनांसाठी अंडरपास पार्किंगही करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. एकंदरीत या कोस्टल रोड प्रोजेक्ट मुळे मायानगरी मुंबईच्या वैभवात अजूनच भर पडणार आहे. निश्चितचं मुंबईच्या सौंदर्यात आणि विकासात भर घालण्यासाठी हा रोड एक महत्वाची भूमिका बजावणार आहे.

आता सद्यस्थितीला या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे काम सुरू असून श्यामलदास गांधी फ्लायओव्हर प्रिन्सेस स्ट्रीट ते राजीव गांधी सेतू म्हणजे वांद्रे-वरळी सीलिंक दरम्यान काम सुरू आहे.

कोस्टल रोडसाठी जवळपास 111 हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. या संपादित केलेल्या एकूण जमिनीपैकी 26.50 हेक्टर जमीन प्रकल्प उभारणीसाठी वापरण्यात येत आहे. तसेच एकूण जमिनीपैकी 14.50 हेक्टर जमीन समुद्र संरक्षण भिंतीसाठी वापरली जात आहे. अन 70 हेक्टर सार्वजनिक जागेसाठी वापरली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

या प्रकल्पाचे फायदे तरी नेमके काय

कोणत्याही इतर रस्ते विकासाच्या प्रकल्पाप्रमाणेच या प्रकल्पाचा सर्वात मोठा फायदा हा वाहतूक कोंडी पासून मिळणारी मुक्तता हा राहणार आहे. यामुळे प्रवासात गती लाभणार आहे. म्हणजे सध्या स्थितीला मरीन ड्राईव्ह ते वरळी सी लिंक हा टप्पा गाठण्यासाठी एका तासाचा वेळ लागतो मात्र ज्यावेळी या प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण होईल तेव्हा हे अंतर वीस मिनिटात गाठता येणे शक्य होणार आहे.

यामुळे प्रदूषण कमी होणार आहे, इंधनाची बचत होणार आहे, दक्षिण आणि पश्चिम मुंबईची वाहतूक यामुळ अजूनच सक्षम होणार आहे.

या प्रकल्पांतर्गत उभारले जाणारे सी वॉल नेमके आहे तरी काय

या प्रकल्पा अंतर्गत समुद्रकिनारी एक सी वॉल उभारली जात आहे. खरं पाहता भरतीच्या काळात मोठमोठाल्या लाटा उसळत असतात. अशा परिस्थितीत यामुळे कोस्टल रोडच्या संरचनेला धक्का पोहोचू शकतो. कोस्टल रोड सुरक्षित राहावा या अनुषंगाने समुद्रकिनारी पाण्याच्या पातळीपासून आठ मीटर उंच सी वॉल म्हणजे भिंतची निर्मिती केली जात आहे.

कोस्टल रोड प्रकल्पामध्ये उभारल्या जाणाऱ्या बोगद्याच्या काही विशेषता

या प्रकल्पाच्या माध्यमातून जो बोगदा उभारला जात आहे तो देशातील सर्वात मोठ्या टनेल बोरिंग मशीन ने तयार केला गेला आहे. मावळा नावाच्या या मशीनच्या माध्यमातून हा बोगदा तयार झाला आहे. या प्रकल्पांतर्गत दोन समांतर बोगदे तयार केली जात आहेत. गिरगाव चौपाटी मलबार हिल ते प्रियदर्शनी पार्क असा हा बोगदा करण्यात आला आहे. पहिल्या बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे. तर दुसऱ्या समांतर बोगद्याचे 80 टक्के काम पूर्ण झालं असल्याचे सांगितले जात आहे.