पुणे-औरंगाबाद आणि पुणे-बेंगलोर ग्रीनफील्ड कॉरिडॉरसाठी भूसंपादनाचा मुहूर्त ठरला ; असे राहतील हे मार्ग, पहा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Expressway : पुणे औरंगाबाद आणि पुणे बेंगलोर हे दोन ग्रीन फील्ड राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हाती घेतले आहेत. विशेष बाब अशी की या दोन महामार्गांसाठी आवश्यक भूसंपादन केल जाणार आहे त्याची जबाबदारी मात्र महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या हाती देण्यात आली आहे.

अशा परिस्थितीत आता राज्य रस्ते विकास महामंडळाला पुणे रिंग रोड आणि या दोन महामार्गांसाठी देखील भूसंपादन पूर्ण करायचा आहे. दरम्यान पुणे रिंग रोड साठी भूसंपादनाची प्रक्रिया ही अंतिम टप्प्यात आली आहे. पुणे रिंग रोड साठी आवश्यक जमिनीचा अंतिम मूल्यांकन पूर्ण झालं असून लवकरच रिंग रोड साठी आवश्यक प्रत्यक्ष भूसंपादन सुरू होणार आहे.

त्यामुळे आता पुणे औरंगाबाद आणि पुणे बेंगलोर या दोन ग्रीन फीड महामार्गासाठी लवकरच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून भूसंपादन प्रक्रिया राबवली जाऊ शकते असं सांगितलं जात आहे. विशेष बाब अशी की, यासाठी एक स्वातंत्र्य कक्ष देखील उभारण्यात आला आहे. दरम्यान आज आपण या दोन महामार्गविषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.

असा राहणार पुणे बेंगलोर महामार्ग

या महामार्गामुळे पुणे ते बेंगलोर प्रवास हा सोयीचा होणार असल्याचा दावा केला जातो. शिवाय यामुळे महाराष्ट्रातील एकात्मिक विकासाला चालना मिळणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, हा सहापदरी महामार्ग महाराष्ट्रात जवळपास 212 किलोमीटर लांबीचा राहणार आहे.

राज्यातील पुणे, सातारा, सांगली या तीन जिल्ह्यांतून हा मार्ग जाणार आहे. एकूण तीन जिल्ह्यांतील नऊ तालुक्यात आणि ९२ गावांतून महामार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे. या महामार्गासाठी २,३२० हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे.

असा राहणार पुणे-अहमदनगर-औरंगाबाद महामार्ग 

हा महामार्ग २४७. ९ किमी लांबीचा आणि सहापदरी राहणार आहे. पुणे, अहमदनगर, औरंगाबाद या तीन जिल्ह्यांतून हा महामार्ग प्रस्तावित राहणार आहे. हा मार्ग या तीन जिल्ह्यांतील १२ तालुक्यातील १२२ गावांतून जाणार आहे.  या महामार्गासाठी देखील 2855 हेक्टर जमीन संपादित होणार आहे.

या महामार्गामुळे पुणे अहमदनगर औरंगाबाद या तीन जिल्ह्याचा एकात्मिक विकास साध्य होणार असल्याचा दावा केला जातो. दरम्यान आता लवकरच या महामार्गाच्या भूसंपादनाचे काम पूर्ण होईल आणि लवकरच प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात होईल अशी आशा व्यक्त होऊ लागली आहे.

पुणे-औरंगाबाद आणि पुणे-बेंगलोर ग्रीन फील्ड एक्सप्रेस-वेबाबत मोठं अपडेट ; ‘या’ दिवशी सुरू होणार प्रत्यक्ष भूसंपादन, पहा सविस्तर