Maharashtra Havaman Andaj : बंगालच्या उपसागरात एक नवीन चक्रीवादळ तयार झाल आहे. या चक्रीवादळाचा प्रभाव तामिळनाडूसहित देशातील अनेक राज्यांमध्ये पाहायला मिळतोय. या चक्रीवादळाला फेंगल असे नाव देण्यात आले आहे. या चक्रीवादळाचा प्रभाव आपल्या महाराष्ट्रावर सुद्धा पाहायला मिळू शकतो असा अंदाज आहे.
याच्या प्रभावामुळे सध्या महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती वाढत आहे. महत्त्वाची बाब अशी की या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे डिसेंबरच्या अगदी सुरुवातीलाच पावसाची हजेरी पाहायला मिळू शकते. राज्यातील बहुतांशी भागात उद्या ढगाळ हवामान तयार होऊ शकते.
एवढेच नाही तर सहा डिसेंबरला मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सांगलीसह राज्याच्या काही जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
आय एम डी मधील तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे दोन डिसेंबर ते चार डिसेंबर दरम्यान राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये आपल्याला ढगाळ हवामान पाहायला मिळणार आहे. तसेच सहा डिसेंबरला राज्यातील पाच सहा जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर या संबंधीत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. विशेषतः द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना या काळात विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. हा अवकाळी पाऊस रब्बी हंगामातील पिकांसाठी फायद्याचा ठरू शकतो मात्र यामुळे द्राक्ष पिकाचे नुकसान होण्याची भीती तज्ञांनी व्यक्त केली आहे.
६ डिसेंबरला महाराष्ट्रातील सांगलीसह सातारा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस पडणार अशी शक्यता आहे. विशेष म्हणजे पंजाब रावांनी देखील डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये राज्यातील काही भागात पाऊस पडणार असा अंदाज वर्तवला आहे.
पंजाबराव यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात 2 डिसेंबर पर्यंत ढगाळ हवामान राहणार आहे. मात्र दोन डिसेंबर ते 4 डिसेंबर दरम्यान नांदेड अहमदपूर उदगीर आंबेजोगाई परळी लातूर केज धाराशिव पंढरपूर या भागात पावसाची शक्यता आहे.
या काळात अगदीच तुरळक ठिकाणी थोडाफार पाऊस होईल मात्र चार डिसेंबर ते आठ डिसेंबर दरम्यान राज्यातील सांगली सातारा कोल्हापूर सावंतवाडी राधानगरी पुणे जत पंढरपूर लातूर बीड संगमनेर कोकण जळगाव संभाजीनगर वैजापूर गंगापूर शिर्डी अहमदनगर धाराशिव या भागात पावसाची शक्यता आहे. सर्वदूर पाऊस पडणार नाही मात्र या सांगितलेल्या भागांमध्ये पावसाची दाट शक्यता आहे.