शासनाचा मोठा निर्णय ! आता ‘त्या’ शिक्षकांना मिळणार अधिकच मानधन; पण….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra News : डिसेंबर 2022 मध्ये झालेल्या हिवाळी अधिवेशनात राज्य शासनाच्या माध्यमातून अनेक निर्णय घेण्यात आलेत. यामध्ये तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांसंदर्भात देखील निर्णय घेण्यात आला. वरिष्ठ महाविद्यालयात तासिका तत्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांना 900 रुपये प्रति तासिका मोबदला देण्याची घोषणा राज्य शासनाच्या माध्यमातून करण्यात आली. राज्य शासनाच्या या निर्णयाचे कर्मचारी संघटनांकडून स्वागत करण्यात आले.

यामुळे राज्यातील वरिष्ठ महाविद्यालयात तासिका तत्त्वावर कार्यरत असलेल्या प्राध्यापकांना मोठा दिलासा मिळाला आहे असं सांगितलं जात होतं. परंतु हिवाळी अधिवेशनात झालेला हा निर्णय आता अर्थसंकल्पीय अधिवेशन संपत आले तरीदेखील शासन निर्णय काढून याची अंमलबजावणी झाली नसल्याने सदर प्राध्यापकांकडून आता नाराजी व्यक्त होत आहे. यामुळे या निर्णयाची अंमलबजावणी नेमकी केव्हा होते याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे.

वास्तविक राज्यभरात 12 हजारापेक्षा अधिक प्राध्यापकांच्या जागा रिक्त आहेत. यापैकी 2 हजारापेक्षा अधिक रिक्त जागांच्या भरतीसाठी शासनाकडून मंजुरी मिळाली आहे. अशा परिस्थितीत राज्यातील अनेक महाविद्यालयात तासिका तत्त्वावर प्राध्यापकांची नियुक्ती झालेली आहे. याच तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांना 27 डिसेंबर 2022 रोजी राज्य शासनाने 900 रुपये प्रति तास का इतका मोबदला देण्याचा निर्णय घेतला.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की सध्या स्थितीला या तासिका तत्त्वावर कार्यरत असलेल्या प्राध्यापकांना 600 रुपये इतकं प्रति तासिका मोबदला दिला जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने तासिका तत्त्वावरील कार्यरत प्राध्यापकांना तीनशे रुपये प्रति तासिका वाढ देण्याचा निर्णय घेतला असल्याने या निर्णयाचे स्वागत झाले.

पण आता हिवाळी अधिवेशन उलटून जवळपास अडीच महिन्यांचा कालावधी झाला आहे तरीदेखील याची अंमलबजावणी झालेली नसल्याने संबंधित कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून नाराजी या ठिकाणी व्यक्त होत आहे. यामुळे राज्य शासनाने हिवाळी अधिवेशनात केलेली घोषणा फक्त घोषणाच ठरू नये, याची प्रत्यक्षात अंमलबजावणी देखील व्हावी अशी आशा यावेळी व्यक्त होत आहे.

कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांना देखील मिळावा याचा लाभ

खरं पाहता हिवाळी अधिवेशनात केवळ वरिष्ठ महाविद्यालयात कार्यरत असलेल्या तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांना दिलासा देण्यात आला आहे. यामुळे कनिष्ठ महाविद्यालयात कार्यरत असलेल्या तासिका तत्वावरील प्राध्यापकांना देखील अधिक मोबदला मिळावा अशी मागणी होत आहे.

सद्या स्थितीला कनिष्ठ महाविद्यालयात जे तासिका तत्त्वावर कार्यरत आहेत अशा प्राध्यापकांना 150 रुपये प्रति तास इतका मानधन मिळत आहे. यामुळे आता या कनिष्ठ महाविद्यालयातील तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांना देखील पाचशे ते सहाशे रुपये प्रति तासिका इतकं मानधन मिळावं अशी मागणी जोर धरत आहे.

तास आणि तासिका यामधील संभ्रम दूर व्हावा

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, सध्या महाविद्यालयात कार्यरत असलेल्या तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांना शासणाकडून प्रति तासावर मानधन दिले जातात. परंतु यामध्ये बदल झाला पाहिजे आणि तासिका तत्त्वावर मानधन मिळाला पाहिजे अशी मागणी कर्मचाऱ्यांची आहे. तास हा 60 मिनिटांचा मात्र तासिका ही केवळ 45 ते 50 मिनिटांचेच असते. यामुळे तासिका तत्त्वावर मानधन लागू करावे अशी देखील मागणी कर्मचाऱ्यांची आहे.