महाबळेश्वर, पाचगणीसहित महाराष्ट्रातील ‘ही’ पर्यटन स्थळे पर्यटकांसाठी बंद राहणार !

महाराष्ट्रातील पर्यटकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे प्रशासनाकडून राज्यातील 15 हून अधिक महत्त्वाची पर्यटन स्थळे बंद करण्यात आली आहेत. अशा परिस्थितीत आता आपण प्रशासनाकडून कोणती पर्यटन स्थळे बंद करण्यात आली आहेत याची यादी पाहणार आहोत. 

Published on -

Maharashtra Picnic Spot : महाराष्ट्रात यावर्षी मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. मान्सूनपूर्व पावसामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये परिस्थिती बिकट झाली होती. दरम्यान मान्सूनचे आगमन झाल्यानंतर आता पुन्हा एकदा राज्यात पावसाचा जोर वाढू लागला आहे.

नाशिक पुणे साताऱ्यासह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कमालीचा वाढलेला दिसतोय. घाटमाथा परिसरात जोरदार पावसाचं आगमन झालं आहे.

हेच कारण आहे की घाटमाथ्यावरील काही प्रमुख पर्यटन स्थळांवर बंदी घालण्यात आली. महाबळेश्वर पाचगणी यासह जवळपास 15 हुन अधिक महत्वाची पर्यटन स्थळे पर्यटकांसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

किती दिवस बंद राहणार सातारा जिल्ह्यातील पर्यटन स्थळे  

गेल्या काही दिवसांपासून सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळे अनेक ठिकाणी नुकसानीच्या घटना समोर आल्या आहे. सातारा जिल्ह्यातील पावसाचा जोर पाहता आता सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्ह्यातील काही महत्वाची पर्यटन स्थळे सर्वसामान्य पर्यटकांसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार महाबळेश्वर, पाचगणी यासह सातारा जिल्ह्यातील सर्वचं प्रमुख पर्यटनस्थळे 19 ऑगस्ट 2025 पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने नुकताच घेतला आहे.

जसं की आपणास ठाऊकच आहे की सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर आणि पाचगणी ही राज्यातीलच नव्हे तर देश-विदेशातील पर्यटकांसाठी आकर्षणाचं केंद्र मानली जातात. या ठिकाणी दरवर्षी लाखो पर्यटक भेटी देतात.

पावसाळा असो हिवाळा असो किंवा मग उन्हाळा येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या कधीच कमी होत नाही. या पावसाळ्यात देखील अनेकांनी महाबळेश्वर तसेच पाचगणी सारख्या थंड हवेच्या ठिकाणांना पिकनिकला जाण्याचा बेत असलेला असेल.

दरम्यान जर तुमचा याही असाच काहीसा प्लॅन असेल तर तुम्हाला तात्पुरता तुमचा प्लॅन रद्द करावा लागणार आहे. कारण की पुढील दोन महिने सातारा जिल्ह्यातील महत्त्वाची पर्यटन स्थळे पर्यटकांसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुसळधार पावसामुळे भूस्खलन, रस्त्यांवरील वाहतूक अडथळे आणि अन्य संभाव्य धोके वाढल्याने खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

कोणती पर्यटन स्थळे बंद राहणार 

जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर, पाचगणी यासहित अजिंक्यतारा किल्ला, ठोसेघर धबधबा, केळवली-सांडवली धबधबा, वजराई धबधबा, कास पुष्प पठार, एकीव धबधबा, कास तलाव, बामणोली,

पंचकुंड धबधबा, सडावाघापूर उलटा धबधबा, ऊरुल घाट शिव मंदिर धबधबा, रुद्रेश्वर देवालय धबधबा, ओझर्डे धबधबा, घाटमाथा धबधबा, लिंगमळा धबधबा पर्यटकांसाठी बंद करण्यात आली आहेत. दरवर्षी पावसाळ्यात या ठिकाणी पर्यटकांची विशेष गर्दी पाहायला मिळते.

मात्र, यावर्षी सुरक्षेच्या दृष्टीने या ठिकाणी प्रवेशावर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे यामुळे जर तुम्ही या ठिकाणी पिकनिक साठी जाणार असाल तर तुम्हाला तुमचा प्लॅन पुढील दोन महिने रद्द करावा लागणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!