मोठी बातमी ! पोलीस कर्मचाऱ्यांच्या गणवेश भत्त्यात झाली ‘इतकी’ वाढ ; पण….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Police News : महाराष्ट्र राज्य शासनाने नुकताच एक शासन निर्णय काढून पोलीस प्रशासनात कार्यरत असलेल्या पोलीस उपनिरीक्षक ते अपर पोलीस अधीक्षक यांच्या गणवेश भत्त्यात वाढ केली. आम्ही आपणास सांगू इच्छितो की आत्तापर्यंत या पोलीस अधिकाऱ्यांना दर चार वर्षांनी पाच हजार रुपये शासनाकडून गणवेश भत्ता दिला जात होता.

मात्र आता यामध्ये वाढ झाली असून दरवर्षी 6000 रुपये गणवेश भत्ता मिळणार आहे. खरं पाहता याबाबतचा प्रस्ताव हा 2018 पासून प्रलंबित होता. मात्र शासनाला हा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी मुहूर्त सापडत नव्हता.

अखेरकार पाच वर्षानंतर महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाला पोलीस प्रशासनात कार्यरत असलेल्या या अधिकाऱ्यांच्या गणवेश भत्त्यात वाढ करण्यासंदर्भात असलेला हा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी मुहूर्त लाभला आहे.

आता या कर्मचाऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपये गणवेश भत्ता मिळणार आहे. मात्र असे असले तरी आपण जर आयपीएस अधिकाऱ्यांच्या गणवेश भत्त्याचा विचार केला तर या अधिकाऱ्यांना मिळणारा गणवेश भत्ता हा अतिशय शुल्लक आहे. आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्यांना 20 हजार रुपये दरवर्षी गणवेश भत्ता दिला जातो.

दरम्यान याच गणवेश भत्त्याची तफावत पाहता 2018 साली तत्कालीन पोलीस महासंचालक यांनी पोलीस कर्मचाऱ्यांच्या गणवेश भत्त्यात वाढ करण्यासंदर्भात एक प्रस्ताव शासनाकडे दिला होता. मात्र तदनंतर राज्यात निवडणुकीचा बिगुल वाजला. आचारसंहिता लावण्यात आली परिणामी हा गणवेश भत्ता वाढीचा विषय लांबणीवर पडला.

खरं पाहता, आतापर्यंत पोलीस उपनिरीक्षक ते पोलीस अधीक्षक यांना दरवर्षी 1250 रुपये गणवेश भत्ता लागू होता आणि चार वर्षांनी 5000 दिले जात होते. मात्र आता दरवर्षी सहा हजार रुपये या अधिकाऱ्यांना गणवेश भत्ता देऊ केला जाणार आहे.

मात्र असे असले तरी दरवर्षी सहा हजार रुपये हा भत्ता गणवेशाची निगा ठेवण्यासाठी अपुरा असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. याबद्दल धुलाई आणि ईस्त्रीचा देखील खर्च भागणार नसल्याचे सदर कर्मचाऱ्यांनी नमूद केले आहे.

कोणत्या पोलीस कर्मचाऱ्याला किती भत्ता

पोलीस कॉन्स्टेबल ते ए एस आय दर्जाच्या कर्मचाऱ्याला 5167 रुपये दरवर्षी गणवेश भत्ता मिळतो.

पीएसआय ते एडिशनल एसपी दर्जाच्या पोलीस कर्मचाऱ्यांना 6000 रुपये दरवर्षी गणवेश भत्ता वाढ लागू झाली आहे.

पीएसआय दर्जाच्या पोलीस कर्मचाऱ्यांना मात्र दरवर्षी वीस हजार रुपये गणवेश भत्ता दिला जातो.

निश्चितच गणवेश भत्त्यात मोठी तफावत पदानुसार पाहायला मिळत आहे. यामुळे गणवेश भत्त्यात वाढ झाली असली तरी देखील कर्मचारी नाखुश असल्याचे चित्र आहे. पोलीस प्रशासनातील कर्मचाऱ्यांना आपला गणवेश नेहमीच टापटीप असा ठेवावा लागतो. अशा परिस्थितीत सदर भत्ता हा गणवेशाची निगा राखण्यासाठी अपुरा असून यामध्ये मोठी वाढ होणे अपेक्षित आहे.