पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा या दोन विभागांना जोडणारा नवा रेल्वे मार्ग ! ‘या’ गावांमधून जाणार मार्ग, मार्च 2027 मध्ये सुरू होणार ट्रायल

राज्यातील पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा या दोन विभागांना जोडणारा नवा रेल्वे मार्ग प्रकल्प लवकरच विकसित होणार आहे. येत्या दोन वर्षात या प्रस्तावित रेल्वे मार्गावर चाचणी सुद्धा सुरू होणार आहे. दरम्यान याच प्रस्तावित रेल्वे मार्ग प्रकल्पाबाबत आता एक नव अपडेट हाती आल आहे.

Published on -

Maharashtra Railway News : पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक गुड न्यूज समोर येत आहे. ती म्हणजे येत्या दोन वर्षांनी महाराष्ट्राला नवीन रेल्वे मार्ग मिळणार आहे. या नव्या रेल्वे मार्गामुळे पश्चिम महाराष्ट्र ते मराठवाडा आणि मराठवाडा ते पश्चिम महाराष्ट्र हा प्रवास वेगवान अन सुरक्षित होईल अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे.

सोलापूर ते धाराशिवदरम्यान हा नवा रेल्वे मार्ग विकसित होणार आहे. याच सोलापूर ते धाराशिव दरम्यानच्या प्रस्तावित रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या संदर्भात एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे.

काय आहे नवीन अपडेट ? 

हाती आलेल्या माहितीनुसार, प्रस्तावित करण्यात आलेल्या नव्या लोहमार्गाचे काम अगदीच वेगाने सुरू असून या प्रकल्पासाठी संपादित केल्या जाणाऱ्या जमिनीचे मूल्यांकन वाढलेले आहे.

सोलापूर जिल्ह्यातून संपादित केल्या जाणाऱ्या जमिनींचे मूल्यांकन वाढले असल्याचे निदर्शनास आल्यानंतर आता या मूल्यवृद्धीमागील कारणांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. यासाठी एका नव्या समितीची स्थापना करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या आदेशानुसार नवीन समिती स्थापन करण्यात आली आहे. अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंह यांच्या अध्यक्षतेखालील या समितीची स्थापना करण्यात आली असून संबंधित समितीच्या माध्यमातून या मागील कारणाच्या चौकशीचे काम हाती घेतलेले आहे.

दरम्यान लवकरच याचा अहवाल सादर केला जाईल अशी शक्यता आहे. या समितीने आतापर्यंत चार-पाच वेळा बैठक घेतल्या असून दहा गावांतील निवाड्यांची तपासणी सुरू केली असल्याचे संबंधितांकडून सांगितले गेले आहे. दरम्यान आता आपण हा रेल्वे मार्ग सोलापूर जिल्ह्यातील कोण कोणत्या गावांमधून जातो याचा आढावा घेणार आहोत.

या गावांमधून जातो प्रस्तावित रेल्वे मार्ग 

धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी या रेल्वे मार्गाच्या कामाबाबत एक महत्त्वाचे अपडेट दिले आहे. नुकत्याच झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत धाराशिव ते तुळजापूर दरम्यानच्या प्रगतीबाबत खासदार महोदयांनी महत्त्वाची माहिती दिली.

यावेळी या रेल्वे मार्गावर मार्च 2027 मध्ये चाचणी होणार असे सांगितले गेले आहे. मात्र, सोलापूर ते तुळजापूर मार्गाचे काम वेगाने व्हावे, अन्यथा धाराशिव ते तुळजापूर मार्गाला अपेक्षित महत्त्व मिळणार नाही, असेही खासदार निंबाळकर यांनी यावेळी क्लिअर केले आहे.

या प्रस्तावित करण्यात आलेल्या नव्या रेल्वेमार्गाची सोलापूर जिल्ह्यातील लांबी 24 किलोमीटर इतकी आहे. उपलब्ध माहितीनुसार यार रेल्वे मार्गात सोलापूर जिल्ह्यातील 260 गट बाधित होत आहेत आणि 167 हेक्टरहुन अधिक क्षेत्र संपादित करण्यात आले आहे.

या प्रकल्पात एकूण पाच हजार 85 लोक बाधित झाले आहेत. संबंधितांना 586 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे यापैकी जवळपास 399 कोटी रुपयांच्या भरपाईचे वाटप सुद्धा झालेले आहे आणि जवळपास 187 कोटी रुपयांची रक्कम संबंधित जमीन मालकांना देणे बाकी आहे. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!