अहमदनगर, पुणे, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि ‘या’ जिल्ह्यात गारपीट होणार ! IMD चा अंदाज

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Rain : राज्यात केल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाचे आणि गारपीटीचे थैमान आहे. अशातच मात्र राज्यात तापमानात वाढ होऊन उकाडा देखील प्रचंड वाढत आहे. त्यामुळे राज्यात नागरिकांना मिश्र हवामानाचे दर्शन होत आहे. या बदललेल्या वातावरणाचा मात्र शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे.

खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे आधीच शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यामुळे रब्बी हंगामात खरिपात झालेल्या नुकसानीची भरपाई वाढीव उत्पादनातून भरून निघेल अशी आशा शेतकऱ्यांना होती. फेब्रुवारी पर्यंत असं वाटतही होतं. मात्र मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने आणि गारपिटीने शेतकऱ्यांच्या सर्व स्वप्नांचा चूराडा केला आहे.

हे पण वाचा :- Petrol Diesel Price : ग्राहकांना दिलासा ! आंबेडकर जयंतीदिवशी पेट्रोल 84.10 आणि डिझेल 79.74 रुपये प्रति लिटर, जाणून घ्या आजचे दर

मार्च महिन्यात झालेल्या पावसापासून थोड्याफार प्रमाणात वाचलेली पिके पुन्हा एकदा एप्रिल महिन्यात होत असलेल्या अवकाळी पावसाने आणि गारपिटीने वाया जाणार आहेत. अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे जोपासलेले पीक ऐन काढणीच्या अवस्थेत पावसामुळे खराब झालेत यामुळे बळीराजाच्या हाता-तोंडाशी आलेला घास पुन्हा एकदा हिरावला गेला असल्याचे चित्र उमटत आहे.

अशातच राज्यात पुन्हा एकदा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाच्या मते आज देखील राज्यात पाऊस पडणार आहे. राज्यातील मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज वादळी वाऱ्यासह पावसाचा आणि गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. निश्चितच यामुळे संबंधित विभागातील शेतकऱ्यांची चिंता वाढणार आहे.

हे पण वाचा :- Symptoms Of Prediabetes : सावधान ! मानेवरील काळ्यारेषांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका, असू शकतात ‘या’ आजाराची लक्षणे

कोणत्या जिल्ह्यात गारपिटीचा इशारा ?

भारतीय हवामान विभागाने जारी केलेल्या आपल्या नवीन हवामान अंदाजानुसार, आज 14 एप्रिल 2023 रोजी मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर, पुणे आणि सातारा या तीन जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपिटीचा इशारा देण्यात आला असून या तिन्ही जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

यासोबतच आज मराठवाड्यातील छत्रपती संभाजीमहाराज नगर, जालना आणि बीड या तीन जिल्ह्यांसाठी देखील गारपिटीचा इशारा आयएमडीने दिला आहे, या जिल्ह्यांना देखील येलो अलर्ट देण्यात आला आहे.

या जिल्ह्यात पडणार वादळी वाऱ्यासह पाऊस

आज 14 एप्रिल रोजी कोकणातीप रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग; मध्य महाराष्ट्रमधील नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, सांगली, कोल्हापूर, सोलापूर; मराठवाडामधील परभणी, हिंगोली, नांदेड, धाराशिव, लातूर; विदर्भमधील बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडणार असा इशारा हवामान विभागाने दिला असून या जिल्ह्यांना देखील येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हे पण वाचा :- तरुणांसाठी आनंदाची बातमी! ITBP मध्ये ‘या’ पदासाठी निघाली भरती; पगार मिळणार तब्बल 85 हजार, पहा भरतीची संपूर्ण…