अवकाळी पावसाचा मुक्काम लांबला ! तब्बल ‘इतके’ आठवडे सलग पाऊस पडणार; भारतीय हवामान तज्ज्ञांचा अंदाज

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Rain Update : उन्हाळा संपण्यासाठी आता मात्र एका महिन्याचा कालावधी बाकी आहे. अर्थातच एका महिन्यानंतर देशात मान्सूनला सुरुवात होणार आहे. राज्यात देखील जून महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात मान्सूनचे आगमन होणार आहे.

मात्र मान्सूनची अनुभूती आत्तापासूनच नागरिकांना होत आहे. कारण की गेल्या महिन्यात आणि या महिन्यात सातत्याने अवकाळी पावसाचा धुमधडाका सुरू आहे. मात्र अवकाळी पावसामुळे शेतकरी अक्षरशः हैराण झाले आहेत.

अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला आहे. यामुळे रब्बी हंगामात शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले आहे. महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र तसेच कोकणातील काही जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडला आहे.

हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी धोक्याची घंटा ! ‘अस’ झालं तर यंदाच्या मान्सून काळात कमी पाऊस पडणार; मान्सून प्रभावित होण्याची शक्यता, पहा काय म्हणताय तज्ञ?

तसेच उत्तर भारतातील इतरही राज्यात पावसाची हजेरी लागली आहे. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश यांसारख्या राज्यात तर हिमवृष्टी झाली आहे. आपल्या राज्यात देखील बहुतांशी जिल्ह्यात गारपीट झाली आहे.

राज्यातील पुणे, अहमदनगर, जळगाव, धुळे, बीड, उस्मानाबाद, नासिक या जिल्ह्यातील बहुतांशी भागात गारपिटीच्या घटना पाहायला मिळाल्या आहेत. दरम्यान भारतीय हवामान विभागाच्या तज्ञांच्या माध्यमातून पुन्हा एक धक्कादायक हवामान अंदाज समोर आला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज 28 एप्रिल 2023 ते 4 मे 2023 पर्यंत महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात अवकाळी पावसाची शक्यता कायम राहणार आहे. 

हे पण वाचा :- आनंदाची बातमी ! एसटी महामंडळात ‘या’ पदासाठी निघाली भरती, पगार मिळणार तब्बल दिड लाख रुपये महिना, जाहिरात पहा

देशाचा पूर्वोत्तर उत्तरेकडील भाग वगळता जवळपास संपूर्ण

देशात पाऊस पडणार आहे. एवढेच नाही तर पुढील चार आठवडे अशीच परिस्थिती कायम राहणार असल्याची शक्यता देखील हवामान तज्ञांच्या माध्यमातून वर्तवण्यात येत आहे. अर्थातच पुढील चार आठवडे देशभरात अवकाळी पाऊस पडू शकतो असे मत हवामान तज्ञांनी व्यक्त केले आहे.

जर हवामान तज्ज्ञांचा हा अंदाज खरा ठरला तर निश्चितच शेतकऱ्यांचे अतोनात असे नुकसान होणार असून यामुळे येणारा मान्सून देखील प्रभावित होऊ शकतो अशी भीती आता व्यक्त होऊ लागली आहे. यामुळे आता हवामान तज्ञांचा हा अंदाज कितपत खरा ठरतो याकडे शेतकऱ्यांसहित संपूर्ण देशवासीयांचे मोठे बारीक लक्ष लागून राहणार आहे.

हे पण वाचा :- मुंबईकरांसाठी आनंदवार्ता! वंदे भारत एक्सप्रेसनंतर मिळणार आणखी एक मोठं गिफ्ट; ‘या’ महिन्यात सुरु होणार ही खास ट्रेन, असा राहणार रूट