Maharashtra Schools : महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या पालकांसाठी आणि शिक्षकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ती बातमी म्हणजे राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडून शैक्षणिक वर्ष 2025 26 मध्ये राज्यातील शाळांना किती दिवस सुट्ट्या राहणार याबाबत माहिती देण्यात आली आहे.
शिक्षण विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार यावर्षी महाराष्ट्रातील सर्व शाळांना 128 दिवस सुट्ट्या राहणार आहेत. या सुट्ट्यांमध्ये 58 दिवस रविवारच्या सुट्ट्या समाविष्ट असतील. तसेच इतर सणासुदीच्या, दिवाळीच्या आणि उन्हाळी अशा एकूण 76 सुट्ट्या राहणार आहेत.

दिवाळीच्या सुट्ट्या 16 ऑक्टोबर ते 27 ऑक्टोबर 2025 या कालावधीत राहतील तर उन्हाळी सुट्ट्या दोन मे 2026 ते 13 जून 2026 या काळात राहतील. दरम्यान, जिल्हाधिकारी व मुख्याध्यापक यांच्या अधिकारात 2 सुट्ट्या असतील.
राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडून शैक्षणिक वर्ष 2025 26 मध्ये राज्यातील शाळांना किती दिवस सुट्ट्या राहणार याची यादी देण्यात आली आहे सोबतच राज्यातील शाळांचे वेळापत्रक देखील प्रसारित करण्यात आले आहे. म्हणून आता आपण राज्यातील शाळांचे यावर्षीचे वेळापत्रक कसे असणार याबाबतची माहिती पाहणार आहोत.
शाळांचे वेळापत्रक कसे असणार ?
शिक्षण विभागाने सांगितल्याप्रमाणे जिल्हा परिषदेच्या शाळांची नियमित वेळ सकाळी साडेदहा ते सायंकाळी पाच अशीच राहणार आहे. तसेच अर्ध्या वेळेची शाळा सकाळी नऊ वाजेपासून ते दुपारी दीड वाजेपर्यंत भरणार आहे.
या कालावधीत काही शाळा सकाळी नऊ ते दुपारी अडीच पर्यंत भरवल्या जाणार
दुसरीकडे, उर्दू माध्यमांच्या शाळांबाबत बोलायचं झालं तर राज्यातील उर्दू माध्यमांच्या शाळाची नियमित वेळ सकाळी साडेदहा ते सायंकाळी पाच अशीच राहणार आहे.
मात्र उर्दू माध्यमातील अर्ध्या वेळेची शाळा ही शाळा सकाळी नऊ ते दुपारी साडेबारापर्यंतचं भरवली जाणार असल्याचे सांगितले गेले आहे.
सोबतच रमजानच्या महिन्यात असणाऱ्या उपवासानिमित्त त्या काळात उर्दू माध्यमाच्या प्राथमिक शाळा सकाळी नऊ ते दुपारी अडीच या वेळेत भरतील, असे शिक्षण विभागाकडून यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे.