महाराष्ट्रातील शाळा कधी सुरू होणार ? 16 जून की 23 जून ? समोर आली मोठी अपडेट

राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या पालकांसाठी आणि शिक्षकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरे तर सध्या राज्यात सगळीकडे नवीन शैक्षणिक वर्षातील शाळा कधी सुरू होणार? याबाबत प्रश्न विचारले जात आहेत. दरम्यान आता याच संदर्भात एक नव अपडेट हाती आल आहे.

Published on -

Maharashtra Schools : सध्या विद्यार्थ्यांच्या उन्हाळी सुट्ट्या सुरु आहेत. जून महिना सुरू झाला की विद्यार्थ्यांकडून शाळा कधी सुरू होणार अशी विचारणा सुरू होती. आज जून महिन्याची 11 तारीख उजाडली आहे यामुळे आता विद्यार्थ्यांकडून राज्यातील शाळांच्या घंटा कधी वाजणार असा सवाल उपस्थित केला जातोय.

खरेतर, या वर्षाच्या नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात 15 जून 2025 पासून होणारा आणि 16 जून पासून राज्यातील जवळपास 25 जिल्ह्यांमध्ये शाळांच्या घंटा वाजणार असे बोलले जात होते.

तसेच विदर्भातील 11 जिल्ह्यांमधील शाळा 23 जून पासून सुरू होतील अशीही माहिती समोर आली होती. वास्तविक, नवीन शैक्षणिक सत्र सुरू होण्याची वेळ जवळ आली आहे. दरवर्षी 15 जूनला नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात होत असते.

पण यंदा मात्र 11 जूनचा दिवस उजाडल्यानंतरही  राज्यातील शाळांना अद्याप शालेय शिक्षण विभागाकडून स्पष्ट आदेश न मिळाल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. नेमक्या शाळा कधी सुरू होणार हाच मोठा सवाल आता उपस्थित होतोय. 

शाळा कधी सुरू होणार ? 

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, एप्रिल महिन्याच्या शेवटी शिक्षण संचालनालयाने 23 जून 2025 पासून शाळा सुरू करण्याचा आदेश दिला होता. मात्र, जिल्हास्तरावर त्या आदेशांची अंमलबजावणी करणारे कोणतेही स्पष्ट निर्देश आजतागायत निघालेले नाहीत.

त्यामुळे नेमक्या शाळा कधी सुरू होणार, 16 जूनला सुरू होणार की 23 जूनला हाच मोठा सवाल आहे. दरम्यान, या अनिश्चिततेमुळे अनेक शाळांनी स्वतःच आपापल्या स्तरावर निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे.

काही शाळांनी शिक्षकांना 15 जूनपासून बोलावले असून, काहींनी 20 जूननंतरची तारीख निश्चित केली असल्याची माहिती यावेळी प्राप्त झाली आहे. या ठिकाणी महत्त्वाची बाब अशी की विद्यार्थ्यांना देखील शाळेत उपस्थित राहण्यासाठी वेगवेगळ्या तारखा दिल्या जात आहेत.

याचाच परिणाम म्हणून दरवर्षी एकत्रित साजरा होणारा प्रवेशोत्सव यंदा विविध दिवशी साजरा होणार की काय अशी भीती व्यक्त होताना दिसत आहे.

गोंधळामागील कारण नेमके काय?

शाळा सुरू होण्याच्या तारखा अजून डिक्लेअर का झालेल्या नाहीत नेमके यामागे काय कारण आहे? असा प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थित होतोय. तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की, या गोंधळाचे एक कारण जिल्ह्यातील ‘शालार्थ’ घोटाळा असल्याचे बोलले जात आहे.

कारण असे की, या घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर शिक्षणाधिकारी पुण्यात तळ ठोकून बसले आहेत. यामुळे जिल्ह्यातील अनेक शैक्षणिक निर्णय रखडले आहेत.

दरम्यान आता जूनचे दहा दिवस उलटूनही शिक्षण विभागाने शाळा सुरू होण्याबाबत कोणतीही स्पष्टता दिलेली नसल्यामुळे पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी पसरलेली आहे. त्यामुळे आता येत्या एक-दोन दिवसात या संदर्भातील आदेश जारी होणार का हे पाहणे उत्सुकतेचे राहणार आहे. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!