महाराष्ट्रातील ‘या’ कर्मचाऱ्यांना ऑक्टोबर महिन्यापासून मिळणार पगारवाढ, तब्बल 6 हजार 500 रुपयांची वाढ होणार !

एसटी कर्मचाऱ्यांचा पगारात तब्बल 6500 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा पगारात सरसकट वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला असून यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांना नक्कीच मोठा दिलासा मिळाला आहे.

Tejas B Shelar
Published:

Maharashtra State Employee News : एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी गुड न्यूज समोर आली आहे. सध्या गणेशोत्सवाचा सण संपूर्ण देशात साजरा केला जात आहे. देशाबाहेरही हा सण मोठ्या आनंदात साजरा होत आहे. दरम्यान, याच गणेशोत्सवाच्या पावन पर्वात एसटी कर्मचाऱ्यांना एक मोठी भेट देण्यात आली आहे.

एसटी कर्मचाऱ्यांचा पगारात तब्बल 6500 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा पगारात सरसकट वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला असून यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांना नक्कीच मोठा दिलासा मिळाला आहे.

याबाबतचा निर्णय एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या निर्णयानंतर घेण्यात आला आहे. मात्र एसटी कर्मचाऱ्यांना मिळालेल्या या सरसकट पगारवाढीचा लाभ कधीपासून मिळणार हा मोठा यक्ष प्रश्न होता. दरम्यान आता याच संदर्भात एक नवीन माहिती समोर आली आहे.

महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे उपाध्यक्ष दिलीप साटम यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, एसटी कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आलेली सरसकट पगारवाढ ऑक्टोबर महिन्याच्या वेतनासोबत दिली जाणार आहे.

आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की एसटी कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आलेली ही वाढ सप्टेंबरपासून लागू करण्यात आली आहे. त्‍यानुसार ऑक्‍टोबर महिन्याचे वेतन काढले जाणार आहे.

तसे निर्देश राज्‍य शासनाने एस.टी. महामंडळाला दिलेसुद्धा आहेत. तसेच १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२४ पर्यंतचा फरक देण्याबाबत महामंडळाने आर्थिक स्थिती सुधारल्यानंतर निर्णय घ्यावा, असेही ठरविण्यात आले आहे.

खरेतर १ डिसेंबर २०१९ रोजी मूळ वेतनात पाच, चार व अडीच हजार इतकी पगारवाढ लागू करण्यात आली. मात्र एसटी कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आलेली ही पगार वाढ खूपच तोकडी असून त्यांना सरसकट किमान पाच हजार रुपये एवढी पगार वाढ लागू झाली पाहिजे अशी संबंधित मंडळीची मागणी होती.

दरम्यान याच मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले होते. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्मचाऱ्यांच्या या प्रलंबित मागण्यांबाबत संबंधित नोकरदार मंडळी सोबत बैठक घेतली. या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांना सरसकट साडेसहा हजार रुपयांची पगारवाढ मिळावी असे ठरवले गेले.

म्हणजे ज्या कर्मचाऱ्यांना पाच हजार रुपयांची पगारवाढ मिळाली आहे त्यांना आता पंधराशे रुपये, ज्यांना चार हजार रुपये पगारवाढ मिळाली आहे त्यांना 2500 रुपये आणि ज्यांना अडीच हजार रुपयांची पगारवाढ मिळाली आहे त्यांना 4000 रुपये इतकी नवीन वाढ लागू करण्यात आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe