Maharashtra Vande Bharat Express Latest Update : महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी आणि गुजरात राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी हाती आली आहे.
ही बातमी आहे वंदे भारत एक्सप्रेस संदर्भात. महाराष्ट्राला आणि गुजरातला आगामी काळात आणखी एक वंदे भारत एक्सप्रेस मिळणार असल्याची बातमी हाती येत आहे.
सध्या देशात एकूण 65 वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहेत. त्यापैकी 11 गाड्या आपल्या महाराष्ट्राला मिळाल्या आहेत ही खरंच अभिमानास्पद गोष्ट आहे. महाराष्ट्रातील सीएसएमटी ते सोलापूर सीएसएमटी ते शिर्डी सीएसएमटी ते जालना सीएसएमटी ते मडगाव मुंबई सेंट्रल ते गांधीनगर मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद नागपूर ते बिलासपूर नागपूर ते इंदोर नागपूर ते सिकंदराबाद पुणे ते कोल्हापूर आणि पुणे ते हुबळी या मार्गांवर ही गाडी सुरू आहे.
महत्त्वाचे म्हणजे आता राजधानी मुंबईला आणखी एक वंदे भारत ट्रेन मिळणार असल्याची खात्रीलायक बातमी एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्ट मधून हाती आली आहे.
ही ट्रेन मुंबई ते सुरत दरम्यान चालवली जाईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे मुंबई ते गुजरात राज्यातील सुरत या दोन प्रमुख उद्योग नगऱ्या एकमेकांना कनेक्ट होणार आहेत.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की मुंबई ते सुरत दरम्यानच्या वंदे भारत ट्रेन ची ट्रायल नुकतीच संपन्न झाली आहे. ट्रायल दरम्यान ही गाडी 130 किलोमीटर प्रति तास या वेगाने चालवण्यात आली होती.
मिळालेल्या माहितीनुसार ट्रायल साठी ही ट्रेन अहमदाबादहून सुरतला आणण्यात आली होती. यामुळे अहमदाबाद-सुरत-मुंबई की सुरत-मुंबई नेमक्या कोणत्या मार्गावर वंदे भारत ट्रेन सुरू होणार याबाबत आता संभ्रमावस्था तयार झाली आहे.
पण मुंबई ते अहमदाबाद वाया सुरत की मुंबई ते सुरत कोणत्या मार्गावर वंदे भारत ट्रेन धावणार याबाबतचा अंतिम निर्णय रेल्वे बोर्डाकडून घेतला जाणार आहे. मात्र जर मुंबई ते सुरत या मार्गावर ही गाडी चालवली गेली तर याचा व्यापाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.
कारण की मुंबई ते सुरत दरम्यान व्यापारी वर्ग दररोज प्रवास करत असतो. या मार्गावर प्रवास करणाऱ्या दैनंदिन प्रवाशांची संख्या विशेष उल्लेखनीय असून हेच कारण आहे की या मार्गावर वंदे भारत ट्रेन सुरू होण्याची शक्यता देखील नाकारून चालत नाही.