रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! महाराष्ट्रातील ‘या’ शहरातून धावणार वंदे भारत एक्सप्रेस, येत्या 15 दिवसात प्रत्यक्ष रुळावर धावणार

महाराष्ट्रातील वंदे भारत एक्सप्रेसचे नेटवर्क आणखी स्ट्रॉंग होणार आहे. राज्यातील एक महत्त्वाचे शहर वंदे भारत एक्सप्रेसने कनेक्ट होणार आहे. दरम्यान आता आपण या नव्या वंदे भारत एक्सप्रेसचा रूट कसा असणाऱ याची माहिती पाहणार आहोत.

Published on -

Maharashtra Vande Bharat : वंदे भारत एक्सप्रेसच्या संदर्भात एक नवीन अपडेट हाती आली आहे. वंदे भारत एक्सप्रेस बाबत बोलायचं झालं तर ही गाडी 2019 मध्ये सुरू झाली. सुरुवातीला ही गाडी नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर चालवली गेली आणि यानंतर टप्याटप्प्याने देशातील इतर महत्त्वाच्या मार्गांवर ही गाडी सुरू करण्यात आली.

सध्या ही गाडी देशातील जवळपास सर्वच राज्यांमध्ये सुरु आहे. महाराष्ट्राला आतापर्यंत अकरा वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळाली आहे. मुंबई येथील सीएसएमटी ते सोलापूर, सीएसएमटी ते शिर्डी, सीएसएमटी ते मडगाव,

सीएसएमटी ते जालना मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद मुंबई सेंट्रल ते गांधीनगर नागपूर ते बिलासपूर नागपूर ते इंदोर नागपूर ते सिकंदराबाद पुणे ते कोल्हापूर आणि पुणे ते हुबळी या मार्गांवर वंदे भारत ट्रेन सुरू आहे.

दरम्यान आता महाराष्ट्रातील वंदे भारत एक्सप्रेसचे जाळे आणखी वाढणार आहे, कारण की राज्याला आणखी एका नव्या वंदे भारतची भेट मिळणार असल्याचे खात्रीलायक वृत्त हाती आले आहे.

कोणत्या मार्गांवर धावणार वंदे भारत ट्रेन

राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ही बातमी कोल्हापूरकरांसाठी अधिक आनंदाची राहणार आहे. कारण की, लवकरच कोल्हापूरला देखील वंदे भारतची भेट मिळणार आहे.

शहरातील छत्रपती शाहू टर्मिनसवरून थेट मुंबईपर्यंत नवी ‘वंदे भारत’ एक्सप्रेस सुरू होणार असल्याचे वृत्त हाती आले आहे. या नव्या सेमी हायस्पीड ट्रेनमुळे मुंबई ते कोल्हापूर हा प्रवास नक्कीच वेगवान होणार आहे.

खरंतर या मार्गावर वंदे भारत ट्रेन सुरू व्हावी अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून उपस्थित केली जात होती. नुकत्याच काही दिवसांपूर्वी संपन्न झालेल्या क्षेत्रीय रेल्वे प्रवासी सल्लागार समितीच्या बैठकीत सुद्धा ही मागणी मांडण्यात आली होती, ज्याला आता सकारात्मक प्रतिसाद सुद्धा मिळाला आहे.

कोल्हापूर ते मुंबई दरम्यान वंदे भारत ट्रेन सुरू होणार असून येत्या पंधरा दिवसांत ही गाडी धावण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना जलद आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव घेता येणार आहे.

कोल्हापूरला आधीच मिळालीये वंदे भारत

खरंतर कोल्हापूरला आधीच वंदे भारत एक्सप्रेस मिळाली आहे. ही गाडी कोल्हापूर ते पुणे या दरम्यान सुरू आहे. मात्र, कोल्हापूर ते मुंबई मार्गावर व्यापारी, नोकरदार आणि प्रवाशांची संख्या फारच मोठी आहे आणि खऱ्या अर्थाने या मार्गावर वंदे भारतची गरज होती आणि हीच गरज लक्षात घेता कोल्हापूर – पुणे वंदे भारत थेट मुंबईपर्यंत सुरू करण्याची मागणी होती.

दरम्यान आता ही मागणी येत्या पंधरा दिवसात पूर्ण होणार अशी शक्यता आहे. या गाडीसाठी खासदार धनंजय महाडिक यांनी सुद्धा मोठा पाठपुरावा केला होता. यानुसार आता लवकरच सकाळच्या वेळेत मुंबईला पोहोचणारी वंदे भारत सुरू होणार आहे. दरम्यान या नव्या गाडीचे वेळापत्रक येत्या काही दिवसांनी जाहीर होण्याची शक्यता आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!