पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर,उस्मानाबाद, लातूर, बीड, परभणीसह ‘या’ जिल्ह्यात पाऊस अन गारपीट होणार ! हवामान विभागाचा ईशारा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Weather Update : गेल्या महिन्यापासून महाराष्ट्रातील हवामानातं सातत्याने मोठा बदल होत आहे. एकीकडे तापमानात वाढ होत आहे तर दुसरीकडे अवकाळी पावसाचे संकट कायम आहे. यामुळे मिश्र वातावरणाची अनुभूती नागरिकांना होत आहे. दरम्यान या वातावरणाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.

अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे. अशातच पुन्हा एकदा महाराष्ट्रात पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून वर्तवण्यात आली आहे. यामुळे थोडेफार प्रमाणात बचावलेले रब्बी हंगामातील पीक देखील वाया जाण्याची शक्यता आहे.

हे पण वाचा :- जुनी पेन्शन योजनेबाबत शासनाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय ! पहा काय घोषणा केली सरकारने

भारतीय हवामान विभागाने आजपासून पुढील तीन दिवस राज्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे गेल्या महिन्यात म्हणजेच मार्चमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. दरम्यान आता एप्रिल महिन्यात तरी पावसाची उघडीप राहील आणि शेतीकामे जलद गतीने करता येतील अशी आशा शेतकऱ्यांना होती.

मात्र आता एप्रिल मध्ये देखील अवकाळी पाऊस आणि गारपीटीची शक्यता आहे. ज्येष्ठ हवामान तज्ञ के एस होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात पुढील तीन दिवस पाऊस पडणार आहे. त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर माहितीनुसार सात, आठ आणि नऊ एप्रिल रोजी राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे.

हे पण वाचा :- आनंदाची बातमी ! ‘या’ राज्य कर्मचाऱ्यांच्या मानधनात साडे सात हजाराची वाढ, पहा….

पुणे जिल्ह्यातही या कालावधीमध्ये अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुणेसह सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यात विजांच्या कडकटासह अवकाळी पाऊस पडणार असल्याची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ञ होसाळीकर यांनी दिली आहे.

सात एप्रिल ते नऊ एप्रिल दरम्यान या संबंधित जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. एकंदरीत राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पाऊस आणि गारपीटीची शक्यता लक्षात घेता शेतकऱ्यांना अधिक सजग राहावे लागणार आहे.

हे पण वाचा :- राज्य कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे होणार? मुख्यमंत्री शिंदे घेणार निर्णय, ‘या’ही मागण्या होणार पूर्ण