Mumbai Expressway News : मुंबईसह महाराष्ट्रातील जनतेसाठी एक कामाची बातमी आहे. खरंतर गेल्या काही वर्षांमध्ये राज्यासह संपूर्ण देशभरातील रस्ते कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी विशेष प्रयत्न झाले आहेत. रस्त्यांच्या बाबतीत केंद्रातील मोदी सरकारचे महाराष्ट्राकडे विशेष लक्ष आहे. यामुळे गेल्या दहा वर्षांच्या काळात महाराष्ट्रात शेकडो किलोमीटर लांबीचे महामार्ग तयार झाले आहेत.
संपूर्ण देशाचा विचार केला असता देशात गत एका दशकाच्या काळात हजारो किलोमीटर लांबीचे महामार्गाचे जाळे विकसित झाले असून आगामी काळात हे जाळे आणखी मजबूत होणार आहे. देशात सध्या स्थितीला अनेक महामार्ग प्रकल्पांची कामे सुरु आहेत. भारतातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग अर्थातच मुंबई-दिल्ली महामार्गाचे काम देखील सुरु आहे. हा महामार्ग प्रकल्प फक्त महाराष्ट्रासाठीच नाही तर संपूर्ण देशासाठी महत्त्वाचा आहे.
या प्रकल्पामुळे देशाचा एकात्मिक विकास साध्य होणार आहे. दरम्यान आता याच प्रकल्पासंदर्भात एक नवीन अपडेट हाती आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार या प्रकल्पाचा एक महत्त्वाचा टप्पा वाहतुकीसाठी सुरू होणार आहे. या नवीन टप्प्यामुळे दिल्ली आणि वडोदरा दरम्यानच्या रस्त्याच्या प्रवासाला फक्त 9 तास लागतील, अशी माहिती दिली जात आहे.
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) दिल्ली ते हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश आणि गुजरातकडे जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा देणारा दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गाचा 845 किलोमीटरचा भाग ऑक्टोबरपर्यंत जनतेसाठी खुला करणार आहे. हा विभाग दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेचा एक भाग म्हणून बांधला जात आहे. मुंबई दिल्ली एक्सप्रेस वे हा 1386 किलोमीटर लांबीचा महामार्ग असून हा देशातील सर्वाधिक लांबीचा रोड प्रकल्प आहे.
या महामार्ग प्रकल्पाच्या बांधकामाचे नऊ वेगवेगळे टप्पे आहेत. NHAI नुसार दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गाचे 80% टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे. दिल्ली ते वडोदरा या मार्गातील उर्वरित ८४५ किमीचे काम पुढील महिन्याच्या अखेरीस पूर्ण होईल. पण, वडोदरा स्ट्रेच हा लोकांसाठी खुला होणारा पहिला भाग राहणार नाही.
कारण की या प्रकल्पाचे आधीच दोन टप्पे वाहतुकीसाठी सुरू करण्यात आले आहेत. मध्य प्रदेशातील 244 किमीचा टप्पा आणि सोहना आणि दौसा दरम्याचा 202 किमीचा टप्पा हे आधीच सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात आले आहेत. दरम्यान आता या प्रकल्पाचा तिसरा टप्पा वाहतुकीसाठी सुरू होणार आहे.
यामुळे हा 1,386 किमीचा कॉरिडॉर या वर्षअखेरीस पूर्ण होणे अपेक्षित आहे. दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्ग राजस्थान आणि मध्य प्रदेशातून प्रवास करून सोहना, हरियाणा, महाराष्ट्राला जोडणार आहे. जयपूर, अजमेर, किशनगड, कोटा, उदयपूर, चित्तौडगड, सवाई माधोपूर, भोपाळ, उज्जैन, इंदूर, सुरतसारख्या अनेक महत्त्वाची शहरे या महामार्ग प्रकल्पामुळे जोडले जाणार आहेत.
हा प्रकल्प वाहतुकीसाठी पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतर भारताच्या राजधानीपासून आर्थिक केंद्रापर्यंत म्हणजेच राजधानी मुंबई पर्यंत कारने प्रवास करण्यासाठी लागणारा वेळ 50% कमी करेल. सध्या मुंबई ते दिल्ली असा प्रवास करायचा असेल तर जवळपास 24 तासांचा वेळ खर्च करावा लागतो. परंतु हा प्रवासाचा कालावधी 50 टक्क्यांनी कमी करण्याची क्षमता या नवीन महामार्ग मध्ये आहे.
म्हणजे जेव्हा हा महामार्ग पूर्णतः वाहतुकीसाठी खुला होईल तेव्हा मुंबई दिल्ली प्रवास फक्त बारा तासात पूर्ण करता येणे शक्य आहे. दुसरीकडे दिल्ली ते वडोदरा प्रवासाबाबत बोलायचं झाला तर हा प्रवास कारने करायचा असल्यास जवळपास 14 तासाहून अधिकचा वेळ लागतो. सध्या या दोन्ही शहरादरम्यानचे अंतर 1300 किलोमीटर आहे मात्र जेव्हा महामार्ग पूर्णपणे बांधून तयार होईल तेव्हा हे अंतर 900 किलोमीटरवर येणार आहे.
म्हणजेच दिल्ली ते वडोदरा यादरम्यानचे प्रवासाचे अंतर तब्बल 400 km ने कमी होणार आहे. हा आकडा नक्कीच छोटा नाहीये. यामुळे प्रवाशांचा बहुमूल्य वेळ वाचणार आहे. हा टप्पा पूर्ण झाल्यानंतर प्रवाशांचे 5 तास वाचतील अशी आशा आहे. म्हणजे दिल्ली ते वडोदरा हा प्रवास फक्त 9 तासात पूर्ण होण्याची शक्यता आहे.