मुंबई-गोवा महामार्गाबाबत मोठी बातमी! ‘या’ महिन्यात पूर्ण होणार काम, पहा किती काम आहे बाकी?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mumbai Goa Expressway : गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाबाबत एक मोठी अपडेट हाती आली आहे. विधानसभेतून या महामार्ग संदर्भात एक मोठी माहिती समोर येत आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या काळात या महामार्गाबाबत उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, या महामार्गावरील पनवेल ते इंदापूर या 84 किलोमीटर अंतराच्या चौपदरीकरणाचे काम सध्या स्थितीला सुरू आहे.

हे काम युद्ध पातळीवर सुरू असून लवकरच हे काम पूर्ण होणार आहे. साधारणता हे काम डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण करण्याचा मानस शासनाचा आहे. या मार्गाच्या एका लेनचे काम मे महिन्यापर्यंत पूर्ण केला जाणार असून दुसऱ्या मार्गीकेचे काम देखील जलद गतीने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. निश्चितच चव्हाण यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे आता डिसेंबर 2023 पर्यंत या मार्गाचे चौपदरीकरणाचे काम पूर्ण होणार आहे.

हे पण वाचा :-Panjabrao Dakh : पंजाबराव डख हवामान अंदाज सांगणं बंद करणार? पहा नेमकं काय आहे हे प्रकरण

यासंदर्भात अधिक माहिती देताना चव्हाण यांनी सांगितले की, या रस्त्याच्या कामाला येत्या गुरुवारपासून जलद गतीने सुरुवात होणार आहे. याच दोन कॉन्ट्रॅक्टरांना काम देण्यात आल आहे. यांच्या माध्यमातून हे काम जलद गतीने आता पूर्ण होणार आहे. एवढेच नाही तर या महामार्गाच्या बांधकामावर लक्ष ठेवण्यासाठी दहा ड्रोन चा वापर केला जाणार आहे.

ड्रोनच्या माध्यमातून कामाचे निरीक्षण होणार असून सकाळ ते संध्याकाळ या ड्रोनअंतर्गत सर्वेक्षण केलं जाणार आहे. एकंदरीत ड्रोन च्या माध्यमातून कामावर लक्ष ठेवून कामांमध्ये होणारी दिरंगाई टाळण्याचा शासनाचा मानस आहे. या महामार्गाचे काम पूर्ण ताकदीने करण्याचा शासनाचा मानस असल्याचे चव्हाण यांनी यावेळी विधानसभेत स्पष्ट केले आहे.

हे पण वाचा :- राज्य शासनाचा मोठा निर्णय! राज्यात वाळूचे लिलाव बंद; आता 8 हजाराची वाळू मिळणार मात्र ‘इतक्या’ रुपयात घरपोच, महसूलमंत्री पाटील यांची माहिती

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंधुदुर्ग जिल्ह्यात बांदा ते राजापूर या रस्त्याचे चौपदरीकरण पूर्ण झाले आहे. तसेच रत्नागिरी जिल्ह्यात परशुराम घाट रस्ता आणि डोंगराळ भागातील कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. एकंदरीत आता या रस्त्याचे काम पूर्णत्वाकडे जात आहे. चव्हाण यांनी सांगितल्याप्रमाणे, पनवेल ते इंदापूर दरम्यान महामार्गाच्या कामासाठी अनेक अडचणी आल्या आहेत.

मात्र या अडचणींवर आता यशस्वीरित्या तोडगा काढण्यात आला आहे. या मार्गासाठी आवश्यक भूसंपादनाचे सर्व काम हे जवळपास पूर्ण झाले आहे. भूसंपादनासाठी दिला जाणारा संपूर्ण मोबदला राज्य शासनाकडे जमा आहे. लवकरच आता बाधित लोकांना मोबदला दिला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! शेतीच्या पाण्याची चिंता मिटली; 21 वर्षीय युवकाने शोधलं भन्नाट तंत्रज्ञान, असा होणार शेतकऱ्यांना फायदा