मुंबई ते गोवा प्रवास होणार सुसाट ! ‘या’ घाट सेक्शनमध्ये होणार ‘हे’ महत्वाचे काम, पहा….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mumbai Goa Travel Breaking News : मुंबई ते गोवा महामार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. खरं पाहता मुंबई ते गोवा महामार्गावर मुंबईहून कोकणात, गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांना पुढील काही दिवस त्रास सहन करावा लागणार आहे. महामार्गाच्या कामासाठी मुंबई ते गोवा महामार्गावरील परशुराम घाट मधील वाहतूक काही दिवस बंद करण्यात आली आहे.

वास्तविक मुंबई गोवा महामार्गाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. मात्र तरीही या महामार्गाचे काम अद्याप पूर्ण झालेली नाही. दरम्यान आता या महामार्गावरील परशुराम घाटातील रुंदीकरणाचे आणि उर्वरित काही कामे करण्यासाठी या घाटातील वाहतूक 25 एप्रिल ते 10 मे पर्यंत ठराविक वेळेसाठी बंद राहणार आहे. 

हे पण वाचा :- नाशिक निओ मेट्रो प्रकल्पाबाबत मोठ अपडेट; आता नवीन प्रस्ताव मंजुरीसाठी केंद्राकडे रवाना, 1100 कोटी रुपयांचा होणार खर्च, पहा संपूर्ण रूट

मिळालेल्या माहितीनुसार 25 एप्रिल ते दहा मे पर्यंत दुपारी बारा वाजेपासून ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत परशुराम घाट वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. यामुळे प्रवाशांना पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागणार आहे. निश्चितच यामुळे प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे.

या कालावधीमध्ये आता हलक्या वाहानांना कळंबस्ते-चिरणी मार्गे वळवण्यात येणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण नजीकच्या परशुराम घाटाचं चौपदरीकरणाचं काम गेली दोन वर्ष युद्ध पातळीवर सुरू आहे. आता परशुराम घाटातील रुंदीकरण्याचे काम आणि उर्वरित काम अंतिम टप्प्यात आले आहे.

हे पण वाचा :- सावधान ! ‘या’ जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता; भारतीय हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट जारी

आता हे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचा मानस आहे. यामुळे हे काम जलद गतीने व्हावे यासाठी या घाटातील वाहतूक काही दिवस बंद करण्यात आली आहे. 25 एप्रिल पासून म्हणजेच आजपासून पुढील 16 दिवस घाटातील वाहतूक दुपारी 12 ते सायंकाळी पाच दरम्यान बंद राहणार आहे.

याची नोंद या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता घ्यावी लागणार आहे. तसेच ज्या कालावधीमध्ये घाट बंद असेल त्यावेळी पर्यायी मार्गाचा वापर प्रवाशांना करावा लागणार आहे. घाट सेक्शन मधील काम पूर्ण झाल्यानंतर मात्र येथील प्रवास हा सुसाट होणार असा आशावाद व्यक्त होत आहे.

हे पण वाचा :- मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; ‘या’ बहुचर्चित उड्डाणपूलाच्या उद्घाटनाचा मुहूर्त हुकला, आता ‘या’ महिन्यानंतर सुरु होणार, पहा….