मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेसला ‘या’ रेल्वे स्थानकावर देखील मिळणार थांबा, पहा….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mumbai Goa Vande Bharat Express New Halt : सध्या महाराष्ट्रात मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेसच्या विशेष चर्चा आहेत. सध्या या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस चे ट्रायल रन घेतले जात आहे. यामुळे आता आगामी काही दिवसात या मार्गावर ती गाडी धावणार असल्याचे चित्र तयार झाले आहे.

मुंबई ते गोवा या मार्गावर ही ट्रेन सुरू झाल्यानंतर महाराष्ट्रात तब्बल पाच वंदे भारत ट्रेन मिळणार आहेत. विशेष म्हणजे मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव दरम्यान सुरू होणारी ही ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुरू होणारी तिसरी गाडी राहणार आहे. तसेच मुंबई येथून सुरू होणारी ही चौथी गाडी राहणार आहे.

हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी दिलासादायक! खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय, वाचा….

या मुंबई ते गोवा वंदे भारत ट्रेन मुळे कोकण वासियांना सर्वाधिक फायदा होणार आहे. ही ट्रेन कोकणातील प्रवास सुसाट बनवणार आहे. यामुळे चाकरमाने यासाठी मोठे उत्सुक आहेत. दरम्यान या ट्रेनला आतापर्यंत या मार्गावर सुरू असलेल्या ट्रेनला ज्या ठिकाणी थांबे देण्यात आले आहेत त्याच ठिकाणी थांबे मिळणार असल्याचे चित्र तयार होत आहे.

अशा परिस्थितीत या मार्गावरील रेल्वे प्रवासी आता खेड रेल्वे स्थानकावर या वंदे भारत ट्रेनला थांबा मिळावा म्हणून आक्रमक बनले आहेत. यासाठी कोकण विकास समितीच्या माध्यमातून केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना पत्र लिहून मागणी करण्यात आली आहे.

हे पण वाचा :- रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर ! पैसे नसले तरीही रेल्वेचे तिकीट बुक करता येणार, भारतीय रेल्वेने सुरू केली ‘ही’ विशेष सुविधा, पहा…

या संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, याआधीच या मार्गावर धावणाऱ्या जनशताब्दी, मंगला, तेजस, गरीबरथ, एलटीटी – कोचुवेली, एलटीटी – करमाळी, तिरूनवेल्ली – दादर, मंगळुरु – मुंबई, हिसार – कोयमतूर, इंदूर – कोचुवेली या गाड्यांना ‘खेड’ रेल्वे स्थानकावर थांबा मिळालेला नाही.

परिणामी या गाड्यांना खेड रेल्वे स्थानकावर थांबा द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. ही मागणी मात्र अद्याप पूर्ण झालेली नसून प्रलंबित आहे. आता या महत्त्वाच्या मार्गावर भारतीय रेल्वेच्या माध्यमातून वंदे भारत सुरु होणार आहे. म्हणून खेड येथे या गाडीला थांबा मिळाला पाहिजें अशी मागणी रेल्वे प्रवाशांच्या माध्यमातून यावेळी केली जात आहे.

हे पण वाचा :- ब्रेकिंग ! म्हाडाच्या मुंबई मंडळातील 4 हजार घरांसाठी सोडतीचे वेळापत्रक जाहीर; केव्हा निघणार जाहिरात, केव्हा लागणार लॉटरी, पहा…..