मुंबईकरांसाठी आनंदवार्ता ! मुंबईत ‘ही’ 6 नवीन रेल्वे स्टेशनं ‘या’ दिवशी सुरु होणार, वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mumbai Local News : राजधानी मुंबई अन उपनगरात कार्यरत असलेल्या लोकलला मुंबईची जीवनवाहिनी म्हणून संबोधलं जातं. मुंबई शहर व उपनगरात दैनंदिन कामानिमित्त जाणाऱ्या चाकरमाण्यांसाठी, स्थानिकांसाठी लोकलचा मोठा फायदा होत आहे. दरम्यान लोकलचे जाळे अधिक विस्तारण्यासाठी प्रयत्न देखील सुरू आहेत. याच प्रयत्नाच्या माध्यमातून लवकरच मुंबईकरांना सहा नवीन रेल्वे स्थानकांची भेट मिळणार आहे.

यामुळे प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. दरम्यान, आज आपण मुंबईमध्ये कोणती नवीन सहा रेल्वे स्टेशन सुरू होणार आहेत याबाबत थोडक्यात जाणून घेणार आहोत. जसं की आपणास ठाऊकच आहे की, नेरूळ-उरण रेल्वे मार्ग लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. हा नेरूळ उरण रेल्वे मार्ग प्रकल्प 27 किलोमीटर लांबीचा असून याचे दोन टप्प्यात काम केले जात आहे.

यापैकी पहिला टप्पा अर्थातच नेरूळ ते खारकोपर पर्यंतचा या आधीच प्रवाशांसाठी खुला करण्यात आला आहे. पहिला टप्पा 12.4 तो मीटर लांबीचा असून दुसरा टप्पा अर्थातच खारकोपर ते उरण या महिन्याअखेरपर्यंत सुरू होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. हा खार कोपर ते उरण चा टप्पा १४.६० किलोमीटर लांबीचा आहे. या दुसऱ्या टप्प्यांमध्ये एकूण पाच रेल्वे स्थानके राहणार आहेत.

ता हा दुसरा टप्पा या महिन्याअखेर सुरू होणार असल्याने ही पाच रेल्वे स्थानके देखील प्रवाशांसाठी खुली होणार आहेत. या रेल्वे प्रकल्प अंतर्गत खारकोपर ते उरण पर्यंत गव्हाणपाडा, रांजणपाडा, न्हावा-शेवा, द्रोणागिरी आणि उरण ही पाच स्थानके राहतील आणि ही स्थानके प्रवाशांच्या सेवेत या महिन्याअखेर सुरू होणार आहेत. ही पाच रेल्वे स्थानके आणि दिघे रेल्वे स्टेशन अशी एकूण सहा रेल्वे स्थानके आता प्रवाशांसाठी खुली होणार आहेत.

दिघे रेल्वे स्टेशनचे काम देखील अंतिम टप्प्यात आले आहे. रेल्वे स्टेशन देखील लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. एकूणच उरण मार्गावरील पाच आणि दिघे रेल्वे स्टेशन अशी एकूण सहा रेल्वे स्थानके सुरु होणार आहेत. आम्ही आपणास सांगू इच्छितो की सध्या स्थितीला मध्य रेल्वे अंतर्गत एकूण 80 लोकल रेल्वे स्थानके आहेत. दरम्यान ही नवीन सहा लोकल रेल्वे स्थानके मध्य रेल्वे अंतर्गत मोडत असल्याने या रेल्वे स्थानकांची संख्या एकूण 86 होणार आहे.

तसेच पश्चिम रेल्वे अंतर्गत लोकल रेल्वे स्थानक संख्या 37 आहे. म्हणजेच आता मुंबईमध्ये एकूण लोकल रेल्वे स्थानकांची संख्या 123 वर जाणार आहे. निश्चितच येत्या काही दिवसात मुंबईमध्ये नवीन सहा रेल्वे स्थानके सुरू होणार असल्याने प्रवाशांना याचा मोठा फायदा होईल, प्रवाशांचा प्रवास आता अधिक गतिमान होण्यास मदत होईल. शिवाय उरण रेल्वे मार्ग या महिन्याअखेर सुरू होणार असल्याची शक्यता पाहता आता छत्रपती शिवाजी महाराज ते उरण पर्यंत थेट लोकलने प्रवास करता येणे शक्य होणार आहे.