Mumbai News : मुंबईकरांसाठी गुड न्यूज ! ‘या’ नव्या उड्डाणपुलामुळे मढ ते वर्सोवा हे अंतर पार होणार मात्र 10 मिनिटात; एका तासाचा वेळ वाचणार, वाचा…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mumbai News : सध्या मुंबई व उपनगरात रस्ते विकासाच्या कामाने जोर पकडला आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, एम एम आर डी ए तसेच इतर स्थानिक प्राधिकरणाच्या माध्यमातून मुंबईमध्ये कोस्टल रोड, सागरी पूल, खाडी पूल, उड्डाणपूल, भुयारी मार्ग विकसित केले जात आहेत. यामुळे मुंबई व उपनगरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होणार असल्याचा दावा केला जात आहे.

अशातच आता मुंबईमधील नागरिकांसाठी एक मोठी गुड न्यूज समोर येत आहे. महाराष्ट्रात सागरी किनारा व्यवस्थापन प्राधिकरणाच्या माध्यमातून मढ ते वर्सोवा या दरम्यान प्रवास करण्यासाठी नवी वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून दिले जात आहे. या प्राधिकरणाच्या माध्यमातून मढ ते वर्सोवा दरम्यान उड्डाणपूल विकसित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

या उड्डाणपुलासाठी तब्बल 700 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून हा सर्व खर्च मुंबई महानगरपालिका च्या माध्यमातून पुरवला जाणार आहे. निश्चितच या उड्डाणपुलामुळे या दोन स्थानादरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की सध्या स्थितीला मढ ते वर्सोवा हा प्रवास करण्यासाठी स्वामी विवेकानंद मार्गाचा वापर करावा लागत आहे. या मार्गाने प्रवास करण्यासाठी मात्र 45 ते 90 मिनिटांचा कालावधी सध्या स्थितीला लागत आहे.

त्यामुळे प्रवाशांचा मोठा वेळ वाया जात आहे. मात्र मंजुरी मिळालेल्या या उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर फक्त दहा मिनिटात मढ ते वर्सोवा हे अंतर पार करता येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मढ बेट ते वर्सोवा हा उड्डाणपूल विकसित होणार असून याची लांबी 01.05 किलोमीटर इतकी राहणार आहे तसेच याची रुंदी ही 27.05 मीटर राहणार आहे.

जसं की आपणास ठाऊकच आहे की, मालाडच्या पश्चिमेकडील मढ परिसर आणि अंधेरीतील वर्सोवा हा भाग समुद्र किनाऱ्याने वेढलेला आहे. अशा परिस्थितीत या भागांत प्रवासाकरिता बोटीचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो. किंवा मग स्वामी विवेकानंद मार्गावरून या भागात प्रवास केला जातो.मात्र विवेकानंद मार्गाने प्रवास केल्यास प्रवाशांना 45 ते 90 मिनिटे लागतात.

तसेच मढ बेट ते वर्सोवा या मार्गावर थेट प्रवासाकरिता फेरीबोटचा पर्याय आहे. पण पावसाळ्यामुळे वर्षातील 4 महिने ही सेवा पूर्णपणे बंद केलेली असते. अशा परिस्थितीत मढ ते वर्सोवा प्रवासासाठी या उड्डाणपुलाची आवश्यकता भासत होती. दरम्यान आता या प्रस्तावाला मंजुरी मिळाली असल्याने या प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर या भागातील प्रवास गतिमान होणार आहे.