Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

खुशखबर ! मुंबईहुन सुटणाऱ्या ‘या’ सुपरफास्ट ट्रेनला दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड रेल्वे स्टेशनवर थांबा मिळणार; पहा डिटेल्स

Mumbai Railway News : भारतात सार्वजनिक वाहतुकीमध्ये रेल्वेचा मोठा दबदबा आहे. भारतीय रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या खूप अधिक आहे. स्वस्तात आणि जलद प्रवास रेल्वेने होत असल्याने रेल्वेने प्रवास करण्यास प्रवासी अधिक पसंती दर्शवतात.

Mumbai Railway News : भारतात सार्वजनिक वाहतुकीमध्ये रेल्वेचा मोठा दबदबा आहे. भारतीय रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या खूप अधिक आहे. स्वस्तात आणि जलद प्रवास रेल्वेने होत असल्याने रेल्वेने प्रवास करण्यास प्रवासी अधिक पसंती दर्शवतात. दरम्यान आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्याने रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

अशा परिस्थितीत आता वेगवेगळ्या मार्गावर काही स्पेशल गाड्या रेल्वेच्या माध्यमातून सुरू केल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. आता मध्य रेल्वे उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर राजधानी मुंबई ते उपराजधानी नागपूर या दरम्यान तब्बल 10 विशेष गाड्या सुरू करणार आहे. याची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे.

हे पण वाचा :- पदवीधर उमेदवारांसाठी खुशखबर ! ‘या’ सरकारी बँकेत निघाली मोठी भरती; आजच करा इथं अर्ज, पहा…

म्हणजे आता मुंबई-नागपूर-मुंबई या मार्गांवर नवीन 10 सुपरफास्ट एक्सप्रेस ट्रेन सुरू होणार आहेत. यामध्ये 6 मे ते तीन जून दरम्यान ०१०३३ ही साप्ताहिक सुपरफास्ट रेल्वेगाडी सुरू केली जाणार आहे. ही गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून दर शनिवारी धावणार आहे.

ही ट्रेन दर शनिवारी ००.२० वाजता सीएसएमटी रेल्वे स्टेशन वरून नागपूरकडे रवाना होईल आणि त्याच दिवशी १५.३२ वाजता नागपूरला पोहोचणार आहे. याशिवाय 30 एप्रिल ते 28 मे पर्यंत ०१०३४ ही सप्ताहिक सुपरफास्ट रेल्वेगाडी देखील सुरू केली जाणार आहे. ही गाडी दर रविवारी विहित कालावधीपर्यंत धावणार आहे.

हे पण वाचा :- पुण्यात नोकरी शोधणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! महापालिकेत ‘या’ पदासाठी नवीन भरती सुरु; आजच करा अर्ज

ही गाडी नागपूरवरून १३.३० वाजता सुटेल व दुसऱ्या दिवशी ४.१० वाजता मुंबईला पोहोचणार आहे. दरम्यान आता आपण या गाडीला कोण-कोणत्या रेल्वे स्टेशनवर थांबा राहणार आहे याची माहिती जाणून घेऊया.

मिळालेल्या माहितीनुसार, ही स्पेशल गाडी दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा येथे थांबणार असून या ट्रेनमुळे निश्चितच मुंबईहून नागपूर दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना फायदा होणार आहे. उन्हाळी सुट्ट्यांमुळे वाढणारी गर्दी पाहता मध्य रेल्वेने घेतलेला हा निर्णय निश्चितच रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक ठरणार आहे. 

हे पण वाचा :- पंजाबराव डख यांच्यावर आरोप लावणारे दीपक जाधव यांचा हवामान अंदाज ! आणखी ‘इतके’ दिवस पडणार अवकाळी पाऊस, पहा…..