ब्रेकिंग ! मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस बाबत मोठी बातमी ; 3 फेब्रुवारीला होणार ‘हे’ महत्वाचं काम, अन मग होणार उद्घाटनाचा मार्ग मोकळा

Mumbai Solapur Vande Bharat Express : या चालू वर्षात देशातील नऊ राज्यात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार असल्याने तसेच पुढील वर्षी लोकसभा निवडणुका रंगणार असल्याने केंद्र शासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकल्पांचे लोकार्पण करण्यासाठी कंबर कसली गेली आहे. वंदे भारत एक्सप्रेस बाबत देखील असंच काहीच आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

या चालू वर्षात एकूण 79 वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवण्याचे टारगेट केंद्र शासनाच्या माध्यमातून ठेवण्यात आले आहे. दरम्यान मुंबई सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस देखील येत्या काही दिवसात प्रवाशांच्या सेवेसाठी दाखल होणार आहे. खरं पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 फेब्रुवारी रोजी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत.

अशा परिस्थितीत या 10 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणी सीएसएमटी ते सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करकमलाद्वारे हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे. मात्र यापूर्वी 3 फेब्रुवारी रोजी या वंदे भारत एक्सप्रेस बाबत एक मोठं काम केलं जाणार आहे. खरं पाहता 3 फेब्रुवारी रोजी मुंबई सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसची चाचणी घेतली जाणार आहे.

Advertisement

ही चाचणी प्रामुख्याने पुणे मुंबई दरम्यान असलेल्या घाट सेक्शन मध्ये होणार आहे. वंदे भारत एक्सप्रेसचा ताशी वेग 160 किलोमीटर असला तरी देखील घाट सेक्शन मध्ये 55 किलोमीटर प्रतितास या वेगाने ही रेल्वे धावणार आहे. यादरम्यान घाट सेक्शन मध्ये यायचं काही अडचणी येतात का हे पाहिलं जाणार आहे. या ठिकाणी एक गोष्ट विशेष अशी की, अन्य रेल्वे गाड्यांना घाट सेक्शन मध्ये जो वेग ठरवून देण्यात आला आहे तोच या वंदे भारत एक्सप्रेसला देखील ठरवून देण्यात आला आहे.

यामुळे ही चाचणी केवळ औपचारिकता म्हणून पार पाडली जाईल अस जाणकार लोकांकडून सांगितलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चेन्नई येथील ‘आयसीएफ’ या रेल्वे डबा बनविणाऱ्या कारखान्यांतून वंदे भारत एक्स्प्रेसचा रेक एक फेब्रुवारीला मुंबईसाठी रवाना होईल. तो दोन फेब्रुवारीला मुंबईला पोचणार आहे. आणि मग तीन फेब्रुवारीला घाटात वंदे भारतची चाचणी ही घेतली जाणार आहे.

Advertisement