Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

मुंबई, ठाणेकरांसाठी खुशखबर ! ‘या’ मेट्रोमार्ग प्रकल्पाबाबत झाला मोठा निर्णय; आता मुंबई ते ठाणे प्रवास लवकरच होणार सुसाट, पहा काय आहे निर्णय?

Mumbai To Thane Metro Route : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून मुंबई शहर आणि उपनगरात वाहतूक व्यवस्था बळकट करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नाचा एक भाग म्हणून शहरात वेगवेगळे मेट्रो मार्ग प्रकल्पांची कामे हाती घेण्यात आली आहेत.

Mumbai To Thane Metro Route : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून मुंबई शहर आणि उपनगरात वाहतूक व्यवस्था बळकट करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नाचा एक भाग म्हणून शहरात वेगवेगळे मेट्रो मार्ग प्रकल्पांची कामे हाती घेण्यात आली आहेत. यामुळे मुंबई शहरातील वाहतूक कोंडी दूर होण्यास मदत होणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

तसेच सार्वजनिक वाहतुकीला चालना मिळणार असल्याने खाजगी वाहनांचा वापर कमी होईल आणि परिणामी प्रदूषण कमी प्रमाणात होईल असा आशावाद व्यक्त होत आहे. दरम्यान आता मुंबई आणि ठाणेकरांसाठी अति महत्त्वाच्या अशा मेट्रो मार्ग चार बाबत एक मोठी माहिती हाती आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या मेट्रो मार्गाचे आतापर्यंत 49 टक्के काम पूर्ण झाले आहे.

हे पण वाचा :- खुशखबर ! मुंबईहुन सुटणाऱ्या ‘या’ सुपरफास्ट ट्रेनला दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड रेल्वे स्टेशनवर थांबा मिळणार; पहा…

या वडाळा – घाटकोपर – ठाणे – कासारवडवली मेट्रो मार्ग 4 चे काम 2019 मध्ये सुरु करण्यात आले. मुंबई आणि ठाणे या दोन शहरा दरम्यान कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी हा मेट्रो मार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबई आणि ठाणेकरांना देखील याचे वेध लागले आहे. वास्तविक, हा 34 किलोमीटर लांबीचा मार्ग आहे आणि 2019 मध्ये याचे काम सुरु झाले पण तरीही या मार्गाचे काम अपेक्षित अशा गतीने झाले नाही.

जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, या मेट्रो मार्गाला कोरोनामुळे अपेक्षित गती मिळाली नाही तसेच इंडो निप्पॉन केलिकल कंपनीने २०१८ मध्ये, तर यशवंत सहकारी गृहनिर्माण संस्थेने २०१९ मध्ये या प्रकल्पाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या रिट याचिकेमुळे देखील याला गती मिळाली नसल्याचे सांगितले जात आहे.

हे पण वाचा :- ब्रेकिंग ! राज्य कर्मचारी पुन्हा जाणार संपावर; ‘या’ मुख्य मागणीसाठी कर्मचारी पुन्हा उपसणार संपाच हत्यार, पहा….

मात्र आता या दोन्ही याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळून लावल्या आहेत. म्हणून आता 14 हजार 450 कोटी रुपये खर्चून विकसित होत असलेला हा मेट्रोमार्ग जलद गतीने पूर्ण होईल असा आशावाद एमएमआरडीएच्या माध्यमातून व्यक्त होत आहे. निश्चितच मुंबई आणि ठाणे वासियांसाठी अति महत्त्वाचा असलेला हा मेट्रो मार्ग न्यायालयाच्या या निर्णयानंतर आता गती पकडेल आणि येत्या काही महिन्यात या मार्गाचे पूर्ण काम होईल अशी आशा आता व्यक्त होत आहे.

हे पण वाचा :- पदवीधर उमेदवारांसाठी खुशखबर ! ‘या’ सरकारी बँकेत निघाली मोठी भरती; आजच करा इथं अर्ज, पहा…